breaking-newsमनोरंजन

आयुष्मानचा ‘बाला’ पुन्हा अडचणीत; दिग्दर्शक, निर्मात्यांविरोधात गुन्हा दाखल

बॉलिवूडमधील हिट ठरत असलेली जोडी भूमि पेडणेकर आणि आयुष्मान खुराणा यांचा आगामी ‘बाला’ हा चित्रपट पुन्हा एकदा वादात सापडला आहे. मार्च महिन्यामध्ये सहाय्यक दिग्दर्शक कमलकांत चंद्रा यांनी  चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांवर स्क्रिप्ट चोरल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता त्यांनी आयुष्मान खुराणा, दिग्दर्शक आणि निर्माता यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाचा निर्णय येण्यापूर्वीच चित्रपटाच्या दिग्दर्शक, निर्मात्यांनी चित्रीकरण सुरु केल्याचा आरोप कमलकांत चंद्रा यांनी केला आहे.

मार्च महिन्यामध्ये कमलकांत चंद्रा यांनी चित्रपट निर्माते दिनेश विजान आणि दिग्दर्शक अमर कौशिक यांच्यावर चित्रपटाची स्क्रिप्ट चोरल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धावही घेतली होती. मात्र न्यायालयाचा निर्णय येण्यापूर्वीच ‘बाला’च्या चित्रीकरणाला सुरुवात झाल्यामुळे त्यांनी याविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरुन कलम ४२०(फसवणूक) आणि कलम ४०६(विश्वासघात) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

“चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी, निर्मात्यांनी न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहायला हवी होती. मात्र त्यांनी असं न करता केवळ १५ दिवसांमध्ये या चित्रीकरणाला सुरुवात केली. त्यामुळे ही न्यायालयाची केलेली फसवणूक आहे. काही दिवसांपूर्वी या संदर्भात मी मुंबई उच्च न्यायालयाकडे धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने पुढची सुनावणीची तारीख १० जून दिली होती. त्यानुसार मी पुढील सुनावणीच्या प्रतीक्षेत होतो.मात्र फिल्ममेकर्सने मात्र त्यांच्या चित्रीकरणाला सुरुवात केली”, असं कमलकांत चंद्रा यांनी सांगितलं.

दरम्यान, ‘बाला’ या चित्रपटाची कथा कमी वयात ओढावलेलं अकाली टक्कलेपणाच्या समस्येने त्रस्त असलेल्या व्यक्तीरेखेभोवती फिरताना दिसून येणार आहे. मात्र ‘बाला’ची कथा ‘वीग’ या चित्रपटाची कॉपी असल्याचा आरोप कमलकांत चंद्रा यांनी केला होता.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button