ताज्या घडामोडीराष्ट्रिय

पांडुरंगाचं दर्शन घेऊन परतताना ; पोलीस अधिकाऱ्यासह भावाचा जागीच मृत्यू

सोलापूर | मोहोळ – पंढरपूर मार्गावर मोहोळच्या पुढे सारोळे – पाटीनजीक भीषण अपघात झाला असून या अपघातात दोन सख्खे भाऊ जागीच ठार झाले आहेत तर चारजण जखमी झाले आहेत. दोन मृत भावांमध्ये एकजण सोलापूर ग्रामीण पोलीस दलात पोलीस म्हणून कार्यरत होता.

मोहोळहून पंढरपूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर सारोळे पाटीजवळ रस्त्याच्या कडेला ट्रक थांबला होता. या थांबलेल्या ट्रकला भरधाव वेगात आलेल्या ओमनी कारने जोराची धडक दिली. या धडकेत दयानंद अण्णाराव बेलाळे (वय ३०) आणि सचिन अण्णाराव बेलाळे (वय ३२) यांचा जागीच मृत्यू झाला. मृत दोघे रा. रोखडा-सावरगाव ता. अहमदपूर जिल्हा लातूर येथील मूळ रहिवाशी असून या अपघातात सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालयातील पोलीस कर्मचारी दयानंद बेलाळे यांचा समावेश आहे.
बेलाळे हे पंढरपूरला पांडुरंगाचे दर्शन घेऊन आपल्या कुटुंबासह घराकडे परत निघाले होते. त्यावेळी पंढरपूरहून मोहोळकडे निघालेल्या एम एच १२ एफ झेड ७३७७ या ट्रकचालकाने सारोळे पाटी जवळील सह्याद्री ढाब्या समोर आपला ट्रक धोकादायक स्थितीत उभा करून धाब्यावर जेवण घेण्यासाठी गेला होता. यावेळी आपल्या कुटुंबासह निघालेले कॉन्स्टेबल दयानंद अण्णाराव बेलाळे, त्यांचा भाऊ सचिन अण्णाराव बेलाळे त्यांची पत्नी स्वाती तर सचिन बेलाळे वय २२ आणि दिपाली दयानंद बेलाळे वय २५ व त्यांची दोन लहान मुले त्रिशा वय ८ वर्ष व श्लोक वय १ वर्ष हे सर्वजण आपल्या ओमनीकार क्रमांक एम एच १२ एन ई ४४८७ या कारने थांबलेल्या ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिल्याने दयानंद व त्याचा भाऊ सचिन या दोघांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातामध्ये दोघांच्या पत्नी स्वाती व दीपाली व मुले त्रिशा व श्लोक हे सर्वजण गंभीर जखमी झाले. यांना खाजगी वाहनातून सोलापूर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या अपघाताचा गुन्हा मोहोळ पोलीस ठाण्यामध्ये उशिरापर्यंत दाखल करण्यात आला नव्हता. मात्र, कॉन्स्टेबल दयानंद यांच्या मृत्यूने मोहोळ पोलीस ठाणे व सोलापुर मुख्यालय यामध्ये मोठी हळहळ व्यक्त केली जात होती. पोलिसांनी पळून जाणाऱ्या ट्रकचालकास ताब्यात घेतले आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button