breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“तलवार आजही आमच्या हातात आहे हे लक्षात ठेवा,” संजय राऊतांचा MIM ला इशारा; नेमकं काय घडलंय?

मुंबई |

औरंगाबाद शहरात आणखी एका पुतळ्यावरून सध्या वाद वाद निर्माण झाला आहे. शहरातील कॅनॉट परिसरात महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्यावरून हा वाद सुरु झाला आहे. तब्बल एक कोटी खर्च करुन हा पुतळा उभारण्याचा प्रस्ताव आहे. एकीकडे शिवसेना, भाजपाने या पुतळ्यासाठी आग्रही मागणी केली असताना दुसरीकडे एमआयएमने मात्र विरोध दर्शवला आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी पुतळ्याला विरोध केला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली असून इशारा दिला आहे.

“महाराणा प्रताप यांना एमआयएमचा विरोध कशासाठी? महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज या देशाच्या शौर्याचं, राष्ट्रभक्तीचं, राष्ट्रवादाचं प्रतिक आहे. मोगलांविरुद्ध, आक्रमकर्त्यांविरोधात त्यांची तलवार चालली, त्यांनी हिंदूंचे रक्षण केलं, हिंदू महिलांना संरक्षण दिलं, हिंदू मंदिरांचं रक्षण केलं म्हणून जर कोणी महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज यांना विरोध करत असेल तर त्यांची तलवार आजही आमच्या हातात आहे हे लक्षात ठेवा,” असा इशाराच संजय राऊत यांनी यावेळी दिला.

पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आमदार अंबादास दानवे यांनी सिडको कॅनॉट परिसरात महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्याचा कामाला सुरुवात करण्याची मागणी केली होती. खासदार इम्तियाज जलील यांनी मात्र महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्याला विरोध केला. याच पैशांमधून ग्रामीण भागातील तरुण आणि तरुणींसाठी सैनिकी शाळा सुरु केली जावी अशी मागणी त्यांनी केली. पालकमंत्री सुभाष देसाई आणि जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी तसं पत्रही दिलं आहे. महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारून काही साध्य होणार नाही, सैनिका शाळा हाच यांच्याप्रती खरा आदर व सन्मान असल्याचं त्यांनी पत्रात नमूद केलं होतं.

  • “गोव्यात भ्रष्टाचाराचे, व्यभिचाराचे, खंडणीचे आरोपी भाजपाचे मुख्य चेहरे”

“गोव्यामध्ये जे मूळचे भाजपाले लोक आहेत ते बाहेर पडत आहेत.उत्पल पर्रीकर यांनी पक्षाचा त्याग केला आहे. श्रीपाद नाईकदेखील अस्वस्थ आहेत. लक्ष्मीकांत पारसीकर जरी भाजपाचा मुख्य चेहरा असले तरी आज हे सगळे बाहेर पडत आहेत. भ्रष्टाचाराचे, व्यभिचाराचे, खंडणीचे आरोपी असणारे हौशे नवशे भाजपाचे गोव्यातील चेहरे झाले आहेत. मुंबईच्या भाषेत सांगायचं झालं तर ये पब्लिक है सब जानती है,” असा टोला संजय राऊतांनी यावेळी लगावला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button