पिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवड शहरात सोमवारी लसीकरण सुरु : या केंद्रांवर मिळणार लस

पिंपरी l प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरातील 15 ते 18 वयोगटातील मुलांना सोमवारी (दि. 24) 29 केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस मिळणार आहे. तर 18 वर्षांपुढील नागरिकांना सोमवारी ‘कोविशिल्ड’, ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे. ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अ‍ॅप, ऑनलाइन स्लॉट बुकिंग पद्धतीने आणि किऑस्कद्वारे टोकन घेतलेल्या लाभार्थ्यांचे लसीकरण होणार आहे.

15 ते 18 वयोगटातील मुलांना खालील केंद्रांवर मिळणार लस

ईएसआयएस हॉस्पिटल मोहननगर, आरटीटीसी  सेंटर, हेगडेवार जलतरण तलाव प्राधिकरण (सोमवारी बंद, मंगळवारी सुरु), फकीरभाई पानसरे उर्दू शाळा चिंचवड स्टेशन, किवळे दवाखाना, प्रेमलोक पार्क दवाखाना, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल अजमेरा, हनुमंतराव भोसले दवाखाना नेहरूनगर, महापालिका कन्या शाळा चिखली, महापालिका शाळा जाधववाडी, नवीन थेरगाव रुग्णालय थेरगाव, महापालिका शाळा वाकड, आबाजी रामभाऊ भूमकर प्राथमिक शाळा भूमकरवस्ती, अण्णासाहेब मगर शाळा पिंपळे सौदागर, जुने भोसरी रुग्णालय, नवीन भोसरी रुग्णालय, छत्रपती शाहू महाराज प्राथमिक विद्यालय दिघी, पंडित जवाहरलाल नेहरू शाळा च-होली, बास्केट बॉल ग्राउंड मोशी, नूतन शाळा ताम्हाणेवस्ती, काळभोर गोठा उर्दू शाळा यमुनानगर, प्राथमिक शाळा 92 म्हेत्रे वस्ती, घरकुल दवाखाना चिखली, नवीन जिजामाता रुग्णालय, कर्मवीर भाऊराव पाटील पिंपरी वाघेरे ड प्रभाग शाळा, आचार्य अत्रे सभागृह संत तुकाराम नगर पिंपरी, कासारवाडी दवाखाना, दापोडी दवाखाना. शकुंतला शितोळे शाळा जुनी सांगवी

18 वर्षांवरील नागरिकांना या केंद्रांवर मिळणार ‘कोविशिल्ड’चा पहिला, दुसरा डोस

हेल्थ केअर वर्कर, फ्रंट लाईन वर्कर, 60 वर्षांवरील सह्व्याधी असलेल्या नागरिकांना दुस-या डोसनंतर 9 महिने अथवा 39 आठवडे पूर्ण झाले असतील तर अशा नागरिकांना प्रिकॉशन डोस देखील खालील केंद्रांवर मिळणार आहे.

कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरिअल हॉस्पिटल आकुर्डी, हेगडेवार जलतरण तलाव प्राधिकरण, संजय काळे सभागृह, साई अंब्रेला संभाजीनगर दवाखाना, कै शिवाजी भोईर सांस्कृतिक सभागृह केशवनगर चिंचवड, जिल्हा परिषद शाळा ताथवडे, महापालिका शाळा पवनानगर काळेवाडी, बिलजीनगर दवाखाना, जुने तालेरा रुग्णालय, मानसरोवर चॅरिटेबल ट्रस्ट क्लीनिक वाल्हेकरवाडी, सेक्टर नंबर 29 आठवडे बाजार शेजारी रावेत, क्वालिटी सर्कल भोसरी, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक भवन खराळवाडी, संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणी नगर भोसरी, महापालिका कन्याशाळा चिखली, महापालिका शाळा जाधववाडी, हनुमंतराव भोसले दवाखाना नेहरूनगर, बाबाजी पांडू भांडे पिंपळे निलख दवाखाना, महापालिका शाळा वाकड, महापालिका क्रीडा संकुल कावेरी नगर, आबाजी रामभाऊ भुमकर प्राथमिक शाळा भुमकर वस्ती, खिंवसरा  पाटील हॉस्पिटल थेरगाव, नवीन थेरगाव रुग्णालय थेरगाव, पिंपळे गुरव माध्यमिक शाळा, सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा मोशी दवाखाना, माजी सैनिक भवन दत्तनगर दिघी, सखुबाई गवळी गार्डन भोसरी, महापालिका बहुउद्देशीय तालीम इमारत बोपखेल, पद्मावती मोबाईल कोविड हॉस्पिटल च-होली, गंगोत्री पार्क दिघी रोड भोसरी, अंकुशराव लांडगे सभागृह भोसरी, काळभोर गोठा बालवाडी यमुनानगर, तळवडे समाजमंदिर शाळा, घरकुल दवाखाना चिखली, ठाकरे शाळा रुपीनगर, विवेकानंद बॅडमिंटन हॉल यमुनानगर, भानसे स्कुल यमुनानगर, महापालिका शाळा रहाटणी, जुने जिजामाता रुग्णालय, अहिल्यादेवी होळकर सांगवी महापालिका शाळा, दीनदयाल शाळा संत तुकाराम नगर पिंपरी, निळू फुले नाट्य गृह पिंपळे गुरव, आचार्य अत्रे सभागृह संत तुकाराम नगर पिंपरी या 43 केंद्रांवर ‘कोविशिल्ड’चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे.

18 वर्षांवरील नागरिकांना या ठिकाणी ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस मिळणार

हेल्थ केअर वर्कर, फ्रंट लाईन वर्कर, 60 वर्षांवरील सह्व्याधी असलेल्या नागरिकांना दुस-या डोसनंतर 9 महिने अथवा 39 आठवडे पूर्ण झाले असतील तर अशा नागरिकांना प्रिकॉशन डोस देखील खालील केंद्रांवर मिळणार आहे.

कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरिअल हॉस्पिटल आकुर्डी, जुने तालेरा रुग्णालय, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल अजमेरा, नवीन थेरगाव रुग्णालय, अण्णासाहेब मगर शाळा पिंपळे सौदागर, खिंवसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव, अंकुशराव लांडगे सभागृह भोसरी, स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल शिवतेजनगर, नवीन जिजामाता रुग्णालय, कर्मवीर भाऊराव पाटील पिंपरी वाघेरे ड प्रभाग शाळा आणि निळू फुले नाट्यगृह पिंपळेगुरव या 11 केंद्रांवर ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे.

स्तनदा माता, गरोदर महिलांना या केंद्रांवर मिळणार लस

अंकुशराव लांडगे सभागृह भोसरी, कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरिअल हॉस्पिटल आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय, आचार्य अत्रे सभागृह संत तुकाराम नगर पिंपरी, अहिल्याबाई होळकर शाळा सांगवी, खिंवसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव, जुने जिजामाता रुग्णालय आणि जुने तालेरा रुग्णालय येथे स्तनदा माता, गरोदर महिलांचे लसीकरण करण्यात येणार आहे. काही डोस राखीव ठेवण्यात आले आहेत. ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अ‍ॅप या पद्धतीने लसीकरण करण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button