breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमनोरंजनमहाराष्ट्र

Law of Love चा Action Packed ट्रेलर प्रदर्शित

१९ मे पासून तुमच्या जवळच्या सिनेमागृहात

पुणे : आजवर प्रेम म्हणजे काय? याचा अर्थ सांगणारे अनेक मराठी सिनेमे आपण पाहिले आहेत. परंतु प्रेमाचा एक कायदाही असतो, असे सांगणारा चित्रपट आजवर कधी निर्माण झालेला नाही. मात्र नवोदित मराठी चित्रपट दिग्दर्शक व अभिनेता जे उदय हे प्रेमाचा कायदा हा अनोखा आणि हटके विषय मांडणारा सिनेमा प्रेक्षकांसाठी घेऊन आले आहेत. ‘लॉ ऑफ लव्ह’ असे या सिनेमाचे नाव आहे. या सिनेमात प्रेक्षकाना प्रेम, प्रेमातला वेडेपणा, ड्रामा आणि ऍक्शनचा थरार पाहायला मिळेल.

‘लॉ ऑफ लव्ह’ हा मराठी चित्रपट ११ मे २०२३ रोजी पॅन इंडिया लेव्हलवर हिंदी भाषेतून प्रदर्शित होणार आहे. ‘लॉ ऑफ लव्ह म्हणजे प्रेमाचा कायदा. प्रेमाचा एक कायदा आहे. तो काय आहे? व त्याचा चांगला आणि वाईट परिणाम तरुण पिढीवर काय पडतो? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला ११ मे रोजी जवळच्या चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा पाहावा लागेल. या सिनेमात फुल्ल टू रोमान्स आणि ऍक्शन अनुभवायलाविशेष म्हणजे, केजीएफ सिनेमातील सुपरस्टार यशला आवाज दिलेला मराठी सुपूत्र सचिन गोआवाजात ‘लॉ ऑफल या चित्रपटाचे हिंदी डबींगझाले आहे.

हेही पाहा – ‘कनार्टक विधानसभा निवडणुकीत मराठी उमेदवारालाच मतदान करा’; राज ठाकरे

या चित्रपटाद्वारे अभिनेता जे उदय हिन्दी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत. तसेच या चित्रपटामध्ये शाल्वी शाह, मोहन जोशी, यतीन कार्येकर, अनिल नगरकर, प्राची पालवे आणि योगेश पवार यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन, कथा आणि पटकथा ही जे उदय यांची असून तेच या चित्रपटाचे निमति देखील आहेत. आणखी एक खास बाब म्हणजे प्रेमाच्या एक वेगळ्या दुनियेत घेऊन जाणारी गाणी या सिनेमात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button