breaking-newsताज्या घडामोडीपुणे

श्री माधव नाथ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त धार्मिक कार्यक्रम

पुणे : श्री योगाभ्यानंद माधव नाथ महाराज संस्थान चित्रकूट गादीचे अधिपती, श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई यांचे सद्गुरु, यांचा ८८ व्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

वात्सल्य भजनी मंडळाचे भजन, दीपप्रकाश पोथी चे सामूहिक पारायण, मंगल गाथा पोथीचे सामूहिक पारायण,रोज दुपारी ४ ते ७ . तसेच दि. २९ मार्च रोजी अखंड नामस्मरण, सकाळी आठ पासून होणार आहे. दि. ३१ मार्च रोजी एकनाथ षष्ठीला श्री सद्गुरु माधव नाथ महाराजांनी आपला देह ठेवला. त्यादिवशी सकाळी लघूरुद्र, श्रीमद् भगवद्गीता पठण, विष्णू पूजन, महाआरती व महाप्रसादाची व्यवस्था केली गेली आहे. संध्याकाळी पंचपदी व रात्री ८ ते ९ भक्ती संगीत व शेजारती होणार आहे.

हेही वाचा – पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई, उर्से टोल नाक्यावर ५० लाखांची रोकड जप्त

सर्व नाथभक्तांनी कार्यक्रमास अवश्य उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दि. ९ एप्रिल रोजी गुढीपाडवा आहे. त्या दिवशी श्री सद्गुरु माधव नाथ महाराजांचा जन्मदिवस व श्री सद्गुरू मंगलनाथ महाराज यांचा गादी आरोहण सोहळा असल्याने त्या दिवशी सकाळी लघूरुद्र ,आरती व तीर्थप्रसाद ,दुपारी ५ ते ७ भक्तराज महाराज, भक्त वृन्द यांचे भजन व आरती असा भरगच्च कार्यक्रम आहे. प.पू.योगेश्र्वरानंद डॉ. श्री मंगलनाथ महाराज (संस्थान, चित्रकूट गादीचे उत्तराधिकारी), यांचा समाधी दिवस १० एप्रिल २०२४ रोजी नऱ्हे, आंबेगाव पुणे येथे संपन्न होणार आहे. या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन श्री माधवनाथ महाराज गादी, १२४२ , रविवार पेठ ,भांडे आळी पुणे येथे करण्यात आले आहे. तेव्हा सर्व भक्तांनी कार्यक्रमास अवश्य उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button