breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘मनसेकडून महायुतीकडे ३ जागांची मागणी’; मनसे नेते बाळा नांदगवकर यांचं वक्तव्य

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपुर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर मनसे महायुतीत सामील होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. मात्र, आता राज ठाकरे महायुतीत येणार हे स्पष्ट झालं आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी याबाबत महत्वाची माहिती दिली आहे.

बाळा नांदगावकर म्हणाले की, ९ एप्रिलला गुढीपाडवा मेळावा होणार आहे. त्याच्या तयारीसंदर्भात आम्ही राज ठाकरेंशी चर्चा केली. दरवर्षी गुढीपाडव्याला राज ठाकरे मेळावा घेतात. त्यासंदर्भात आम्ही चर्चा केली. बाकी ज्या राजकीय गोष्टी आहेत त्यासंदर्भात दोन ते चार दिवस थांबा तुम्हाला सगळ्या गोष्टी समोर येतील. या सगळ्या चर्चा मी वृत्तपत्रात आणि वाहिन्यांवरच पाहिल्या आहेत. अशी काही चर्चा झाली आहे का? याची मला कल्पना नाही. जर तशी चर्चा झाली असेल तरीही त्याची माहिती ही राज ठाकरेच देऊ शकतील.

हेही वाचा   –    पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई, उर्से टोल नाक्यावर ५० लाखांची रोकड जप्त

मनसेने तीन जागांचा प्रस्ताव महायुतीसमोर दिला आहे. लोकसभेला मनसे ३ जागा लढवण्यास इच्छुक आहे असं महायुतीला राज ठाकरेंनी सांगितलं होतं. त्यावर चर्चा सुरु होती. आता आम्ही २ जागा मागितल्या आहेत. यावर राज ठाकरे आणि भाजपात चर्चा सुरु आहे. त्या जागा नेमक्या कुठल्या आहेत हे राज ठाकरे सांगू शकतील. योग्य तो निर्णय पक्षप्रमुख म्हणजेच राज ठाकरे घेतील, असंही बाळा नांदगावकर म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button