TOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

टाटा एअरबसवरुन राजकारण तापलं ः प्रसाद लाडांचे टक्केवारीचे आरोप, सुभाष देसाईंचं भाजप नेत्यांनाच चॅलेंज

  • सुभाष देसाईंनी आरोप फेटाळले
  • प्रसाद लाड यांच्या आरोपांवर संताप
  • पुरावे देण्याची देसाईंची मागणी

मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

टाटा एअरबस प्रकल्प गुजरातच्या वडोदरामध्ये होणार असल्याचं काल स्पष्ट झालं. संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार ३० ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते टाटा एअरबस प्रकल्पाची पायाभरणी होणार आहे. वेदांता फॉक्सकॉननंतर आणखी एक प्रकल्प गुजरातला गेल्यानं महाराष्ट्रात आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. सुभाष देसाई ज्येष्ठ नेते आहेत त्यांचा आदर आम्ही करतो. ते जर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करत गेले तर महाराष्ट्रात येणारे प्रकल्प का गेले याची जंत्री मांडू असं प्रसाद लाड म्हणाले. फॉक्सकॉन, टाटा एअरबस, डीआरडीओचे प्रकल्प कोणी थांबवले यांचं उत्तर द्यावं, दुबईत कोण बैठक घेत होते? सुभाष देसाई यांच्या टक्केवारीमुळं प्रकल्प गेल्याचा आरोप प्रसाद लाड यांनी केला होता. प्रसाद लाड यांच्या आरोपावर एका मराठी वृत्त वाहिनीशी बोलताना सुभाष देसाई यांनी खबरदार वाटेल ते आरोप सहन करणार नाही, असा इशारा दिला. जे आरोप करत आहेत त्यांनी पुरावे द्यावेत, असं आव्हान देसाई यांनी दिलं.

सुभाष देसाई काय म्हणाले?
मला असं वाटत की, शिंदे फडणवीस सरकार स्थापन करण्यामागं देखील महाराष्ट्रातील प्रकल्प पळवताना विरोध व्हायला नको, हे एक कारण असू शकतं. प्रकल्प गेल्या वर्षी गेला आहे तर आज का बातम्या दिल्या जात आहेत. २२ हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला गेला आज बातमी का दिली जात आहे. भूमिपूजन दोन दिवसांनी होणार आहे, ही बातमी मविआनं दिली आहे का? जे काय घडलं ते मान्य करा, असं सुभाष देसाई म्हणाले.

भाजपच्या आरोपांविषयी विचारलं असता, खबरदार वाटेल ते आरोप सहन करणार नाही. ज्याला कुणाला आरोप करायचे आहेत त्यानं त्याठिकाणी पुरावा द्यावा, ज्याला कुणाला आरोप करायचे आहेत त्यानं पुरावा द्यावा, काय बालिशपणे बोलत आहेत, असं सुभाष देसाई म्हणाले.

लढाऊ विमान बनवणारी कंपनी एअरबसची निवड झाल्यानंतर टाटा पुढं आले. महाराष्ट्र सरकारनं यानंतर त्यासाठी प्रस्ताव दिला. एमआडीसीचे अधिकारी तिथं गेले होते. जमीन, वीज, पाणी आणि कुशल मनुष्यबळ देऊ, असं त्यांना सांगितलं होतं, असं सुभाष देसाई म्हणाले. या संदर्भातील माहिती देवेंद्र फडणवीस यांना देखील माहिती होती. नागपूरमधील मिहान येथे प्रकल्प होणार होता. टाटा समुहाच्या अध्यक्षांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली होती. टाटा ग्रुपच्या अध्यक्षांसोबत मराठवाड्यात सोलर पार्क उभारण्याबाबत चर्चा झाली होती, असंही देसाई म्हणाले.

महाविकास आघाडीवर खापर फोडून महाराष्ट्रात गुंतवणूक वाढणार असेल तर रोज खापर फोडा. गुजरातमध्ये तीन महिन्यात तीन प्रकल्प जाणे हा योगायोग आहे का, असा सवाल सुभाष देसाई यांनी केला. हिमाचल प्रदेश आणि गुजरातची निवडणूक जाहीर व्हायची, आता फक्त हिमाचल प्रदेशची निवडणूक जाहीर झाली गुजरातची निवडणूक लांबली हा योगायोग आहे का? असा सवाल सुभाष देसाई यांनी केला.

महाराष्ट्राला प्रकल्प मिळण्याऐवजी प्रकल्प जात आहेत. महाराष्ट्राच्या ताट वाढण्याऐवजी ताट हिसकावून घेतलं जात आहे, असं सुभाष देसाई म्हणाले. संपूर्ण महाराष्ट्राला सुभाष देसाई काय चीज आहे हे माहिती आहे. गेल्या ५६ वर्षापासून मी शिवसेना पक्षासोबत काम करत आहे. चांगले प्रकल्प उभे केले आहेत. मी महाराष्ट्राच्या हितासाठी बोलणार आहे, जे खूर्चीवर बसलेत त्यांच्यावर टीका झाली तरी मला पर्वा नाही. महाराष्ट्राच्या हितासाठी मी बोलत राहणार आहे, असं सुभाष देसाई म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button