breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमराठवाडा

जळगाव ।शिवसेनेच्या लता सोनवणे यांची आमदारकी धोक्यात?

जळगाव । जिल्ह्यातील चोपडा विधानसभा मतदार संघात शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेच्या आमदार लता चंद्रकांत सोनवणे यांची आमदारकी धोक्यात आली आली आहे. आमदार लता सोनवणे यांचा जातीचा दाखला रद्द ठरवण्यात आला आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून अनुसूचित जमातीच्या राखीव जागेसाठी लता चंद्रकांत सोनवणे यांना तिकिट देण्यात आले होते. निवडणुकीत पराभूत झालेले माजी आमदार जगदीशचंद्र वळवी यांनी लता सोनवणे यांच्या जात प्रमाणपत्राला औरंगाबाद येथील उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशाने जात पडताळणी समिती नंदुरबार कार्यालयाकडे या खटल्याचा तपास सोपवण्यात आला होता. नंदुरबार येथील जात पडताळणी समितीने आमदार लता चंद्रकांत सोनवणे यांनी नामनिर्देशन पत्रासोबत जोडलेले टोकरी कोळी जातीचे प्रमाणपत्र रद्द ठरवले आहे. लताबाई चंद्रकांत कोळी कागदोपत्री पुराव्यांच्या आधारे, तसेच आप्तभाव संबंध परीक्षेच्या आधारे त्यांचा टोकरे कोळी अनूसुचित जमातीचा दावा सिद्ध करू शकल्या नाहीत. त्यामुळे त्यांचा हा दावा अवैध ठरवण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button