ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

राष्ट्रमाता जिजाऊ यांनी प्रजेसाठी कल्याणकारी राज्य निर्माण केले : प्रतिभा मिश्रा

न्यू सिटी प्राईड स्कूलमध्ये स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात

पिंपरी : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फौंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूल यांच्या वतीने स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस प्रमुख पाहुण्या सौ. प्रतिभा मिश्रा, दत्ता शिनगारे व आकाश कडलग यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबूकस्वार, मुख्याध्यापिका नाजनीन शेख, उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना संबोधित करताना प्रतिभा मिश्रा म्हणाले, राष्ट्रमाता जिजामाता यांनी प्रजेसाठी कल्याणकारी राज्य निर्माण केले. जिजाईमाता, रमाईमाता, अहिल्यामाता होळकर व सावित्रीमाता फुले यांनी खूप कष्ट केले. त्या सर्वांच्या माता होत्या. त्यांचा आदर्श सर्वांनी ठेवला पाहिजे.

बबीता नागपुरे – पाटील, रेणू राठी, श्वेता गायकवाड, उर्मिला ठोंबरे – घोगरे या शिक्षकांनीही आपले इंग्रजी, मराठी, हिंदीत मनोगत व्यक्त केले. हेमा सिंग यांनी सूत्रसंचालन केले व पाहुण्याचे आभार भावना देवरे मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button