breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

करोना लसीकरण प्रमाणपत्रावर पंतप्रधान मोदींऐवजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा फोटो!

नवी दिल्ली |

देशातील करोनाचा जोर ओसरत असला तरी राजकारण काही केल्या थांबायचं नाव घेतनाही. सत्ताधारी आणि विरोधक आरोग्य यंत्रणा सुसज्ज करण्याऐवजी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात धन्यता मानत आहेत. त्यात करोना लस प्रमाणपत्रावरील फोटोचा वाद रंगला आहे. करोना लस घेतल्यानंतर कोविन अ‍ॅपवरून मिळणाऱ्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो येत असल्याने भाजपाविरोधी राज्यांनी आक्षेप घेतला आहे. छत्तीसगडनंतर आता पश्चिम बंगालमध्ये करोना लसीकरण प्रमाणपत्रावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा फोटो दिसणार आहे.

तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणावेळी १८-४४ वयोगटातील नागरिकांना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा फोटो असणारं प्रमाणपत्र मिळणार आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका जाहीर होण्याआधीपासूनच भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये वाद सुरु झाला होता. निवडणुका जाहीर झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र लिहून लसीकरण प्रमाणपत्रावरील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोला आक्षेप घेतला होता. आचारसंहितेचं उल्लंघन होत असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला होता. मात्र आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा फोटो लसीकरण प्रमाणपत्रावर लागणार असल्याने दोन्ही पक्षांमधील वाद आणखी वाढणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button