breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘शिवीगाळ, धमकी देणाऱ्याला ब्राम्हण कसं म्हणायचं?’ छगन भुजबळ यांचा सवाल

मुंबई : ब्राह्मण समाजात संभाजी आणि शिवाजी असं नाव नसतं असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानामुळे ब्राह्मन समाज विरूद्ध छगन भुजबळ असा वाद सुरू झाला आहे. छगन भुजबळ यांच्या कानाखाली मारणाऱ्याला १ लाख रूपयांच बक्षीस देणार, अशी घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, यावरून मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

छगन भुजबळ म्हणाले, महात्मा ज्योतिबा, सावित्रीबाई फुलेंसह ब्राह्मण समाजातील लोकांनीही सुधारणा केली होती. यामुळे कोणाला राग येण्याचं कारण नाही. बाकीच्या धमक्यांना मी भीक घालत नाही. ब्राह्मण आहेत म्हणतात आणि घाणेरड्या भाषेत शिव्या देतात. यांना ब्राह्मण कोण म्हणणार? ज्यांच्या तोंडात घाणेरड्या शिव्या आहेत, त्यांना ब्राह्मण म्हणायचं? असा सवाल त्यांनी केला आहे.

हेही वाचा – कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची मोठी घोषणा!

मी चुकलो असेन तर माझ्याविरोधात कारवाई करावी. सरस्वतीची पूजा करू नका असं मी म्हणालो नाही. ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले हे आमचे देव आहेत. शाळेत महाविद्यालयात हे आपले देव आहेत, त्यांची पूजा करा, असं मी म्हणालो. माझं मत मांडण्याचा मला अधिकार आहे, असंही छगन भुजबळ म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button