breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राष्ट्रवादीची नवी कार्यकारणी जाहीर; शहराध्यक्षपदी अजित गव्हाणे, तर महिला शहराध्यक्षपदी कविता आल्हाट

पिंपरी । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ नगरसेवक अजित गव्हाणे यांची आज (शनिवारी) नियुक्ती करण्यात आली आहे. तर, युवक शहराध्यक्षपदी इम्रान शेख आणि महिला शहराध्यक्षपदी प्रा. कविता आल्हाट यांना संधी देण्यात आली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडी करण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या नियुक्त्या केल्या आहेत. दरम्यान, तीनही विधानसभानिहाय कार्याध्यक्ष नेमण्यात आले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसने संघटनेत फेरबदल करण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार शहराध्यक्षपदाच्या दोन टर्म पूर्ण झालेल्या संजोग वाघेरे यांच्याजागी अजितगव्हाणे यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने अजित गव्हाणे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.
शहराध्यक्ष अजित गव्हाणे उच्च शिक्षित, शांत, संयमी, मितभाषी आहेत. त्यांची नगरसेवकपदाची चौथी टर्म आहे. त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्षपदही भूषविले आहे. शहराच्या राजकारणाची त्यांना संपूर्ण जाण आहे.
जगदीश शेट्टी, प्रशांत शितोळे, राहुल भोसले कार्याध्यक्ष
पिंपरी-चिंचवड शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघानिहाय कार्याध्यक्ष नेमण्यात आले आहेत. पिंपरी विधानसभा मतदारसंघासाठी माजी नगरसेवक जगदीश शेट्टी, चिंचवड विधानसभेसाठी माजी नगरसेवक प्रशांत शितोळे आणि भोसरी मतदारसंघाचे कार्याध्यक्ष म्हणून नेहरूनगर येथील नगरसेवक राहुल भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
युवकच्या कार्याध्यक्षपदी पिंपरी मतदारसंघातून लिंकरोड येथील निलेश निकाळजे, चिंचवड मतदारसंघातील प्रसन्न डांगे आणि भोसरीतील योगेश गवळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महिला कार्याध्यक्षपदी चिंचवड मधील ज्योती गोफणे, काळभोरनगर येथील सविता धुमाळ आणि सांगवीतील उज्जवला ढोरे यांची निवड करण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button