ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

सांगवीतून बुलेट, तळेगाव-वाकडमधून पल्सर लंपास

पुणे | सांगवी परिसरातून बुलेट, तर तळेगाव दाभाडे आणि वाकड परिसरातून दोन पल्सर दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. याबाबत सोमवारी (दि. 28) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पवनकुमार कैलास परमार (वय 30, रा. नवी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची 70 हजार रुपये किमतीची बुलेट दुचाकी त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमधून चोरट्यांनी चोरून नेली. हा प्रकार सोमवारी (दि. 28) सकाळी साडेनऊ वाजता उघडकीस आला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.दत्तात्रय ज्ञानू थरकुडे (रा. कल्लाट, ता. मावळ) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची पंधरा हजार रुपये किमतीची पल्सर दुचाकी अज्ञात चोरट्यांनी पवना हॉस्पिटलच्या पार्किंगमधून चोरुन नेली. हा प्रकार 26 जून सायंकाळी साडेसात ते 27 जून सकाळी सात वाजताच्या कालावधीत घडला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

अजय विजय फाटक (वय 29, रा. डांगे चौक, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची 45 हजार रुपये किमतीची पल्सर दुचाकी अज्ञात चोरट्यांनी सोमवारी सकाळी दहा वाजता गणेश मंदिर थेरगाव येथून चोरून नेली.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button