पिंपरी / चिंचवड

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

पिंपरी l प्रतिनिधी

अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली. ही घटना 22 ते 26 फेब्रुवारी 2022 या कालावधीत मोरेवस्ती, चिखली येथे घडली.

दत्ता कमलाकर सूर्यवंशी (वय 36, रा. मोरेवस्ती, चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलीला आरोपी हा भावाच्या लग्नासाठी घेऊन गेला. त्यानंतर अल्पवयीन मुलीला आरोपीने त्याच्या घरी ठेवून घेऊन तिला हाताने मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर जबरदस्तीने वारंवार लैंगिक अत्याचार केले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button