breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमुंबईराजकारण

राज्यसभा निवडणूक : आमदार अण्णा बनसोडे ‘नॉटरिचेबल’; राष्ट्रवादीचे टेन्शन वाढले!

पिंपरी : राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. आज शुक्रवारी (दि. 10) मतदान होत आहे. या मतदानाला जाण्याचा निर्धार चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी केला होता. गंभीर आजारी असताना देखील पक्षाचा विश्वास जपत रुग्णवाहिकेतून पुणे – मुंबई महामार्गाने ते मुंबईकडे रवाना झाले आहेत. तर दुसर्‍या बाजूला पिंपरी विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार आण्णा बनसोडे ‘नॉट रिचेबल’ असल्याने राष्ट्रवादीचे टेन्शन वाढले असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहा रिक्त जागांसाठी निवडणुका सुरू आहेत. सहाव्या जागेसाठी जोरदार चुरस लागली असल्याने प्रत्येक आमदाराचे मत महत्त्वाचे मानले जात आहे.  त्यानुसार प्रत्येक पक्षाने आपापल्या आमदारांना मतदानाचा हक्क बजाविण्याच्या सूचना केल्या आहेत. या सूचनेचा आदर करत चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप मुंबईकडे रुग्णवाहिकेतून रवाना झाले आहेत. आ. जगताप हे गंभीर आजारांनी त्रस्त आहेत. मात्र पक्षाने दिलेल्या सूचनांचे पालन करत असल्याचे त्यांनी सांगत मतदानाला जाण्याचा कुटुंबीयांकडे आग्रह धरला. त्यानुसार ते पुणे मुंबई महामार्गाने रुग्णवाहिकेतून मुंबईकडे रवाना झाले आहेत.

दरम्यान, पिंपरी विधानसभेचे आमदार अद्याप विधानभवनात पोचले नसल्याची माहिती आहे. त्यांच्याशी संपर्क केला जात आहे. मात्र ते नॉट रीचेबल आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते देखील अनभिज्ञ असून पक्षाचे टेन्शन वाढले असल्याची चर्चा आहे. मात्र आमदार बनसोडे हे विधानभवनात येऊन मतदानाचा हक्क बजावतील असा आशावाद राष्ट्रवादीचे पदाधिकारी व्यक्त करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button