Uncategorized

मोबाईल बॉक्समध्ये जिवंत बॉम्ब, औरंगाबादेत खळबळजनक प्रकार, निष्क्रिय करताना स्फोट

औरंगाबाद: औरंगाबादेतील कन्नड परिसरात आज एक बॉम्ब सदृष्य वस्तू आढळून आल्याने खळबळ उडाली. फर्निचरच्या दुकानामध्ये अज्ञाताने ठेवलेली संशयास्पद वस्तू अखेर बॉम्बच असल्याचं निष्पन्न झालं. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने वेळीच घटनास्थळी धाव घेत तो बॉम्ब निष्क्रिय केला. मात्र, निष्क्रिय करताना त्या बॉम्बचा स्फोट झाला. सुदैवाने या घटनेत कुठलीही हानी झाली नाही. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. हा बॉम्ब कोणी तयार केला आणि दुकानात का ठेवला?, याचा तपास पोलीस करीत आहे.

या घटनेप्रकरणी अधिक माहिती अशी की, किरण राजगुरू यांची कन्नड येथे फर्निचर विक्रीचे दुकान आहे. नेहमी प्रमाणे आज सकाळी ते दुकान उघडण्यासाठी गेले असता दुकानात एका मोबाईलचा बॉक्स त्यांना दिसला. त्यांनी तो बॉक्स उघडला असता त्यामध्ये बॅटरी वायर असलेली बॉम्ब सदृश्य वस्तू दिसून आली. याबाबत किरण यांनी पोलिसांना माहिती दिली.

बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला घटनस्थळी पाचारण करण्यात आले. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून पोलिसांनी परिसर निर्मनुष्य केला होता. बॉम्ब शोधक पथकाने हा बॉम्ब निष्क्रिय केला. दरम्यान एक स्फोट झाला. मात्र, सुदैवाने कुठलीही हानी त्या स्फोटमुळे झाली नाही.हा एक प्रकारचा सौम्य बॉम्ब होता. मात्र, आरडिक्स सारख्या घातक स्फोटकाचा वापर करण्यात आलेला नव्हता, अशी माहिती औरंगाबाद ग्रामीण पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button