breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रविदर्भ

जुनी थकबाकी दाबण्यासाठी भाजप आंदोलन करतंय, वाढीव वीजबिलावरून ऊर्जामंत्र्यांचा आरोप

नागपूर – लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्रातील जनतेला अव्वाच्या सव्वा वीज बिले आहे. यामुळे भाजपसह अनेक पक्षांनी सत्ताधारी पक्षांना धारेवर धरलं होतं. मात्र, यावर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शिवाय त्यांनी भाजपला अनेक प्रश्न विचारले आहेत.

नितीन राऊत म्हणाले की, महावितरण आता संकटात आहे. भाजपच्या काळात मोठ्या प्रमाणात थकबाकी वाढली होती. त्याचा परिणाम आता दिसत आहे. जुनी थकबाकी दाबण्यासाठीच भाजप आंदोलन करत आहेत. वीज बिल भरलंच नाही तर वीज निर्मिती कशी होणार? असा प्रश्न विचारत ऊर्जामंत्र्यांनी जनतेला वीज बिल भरण्याचं आवाहन केलं आहे. भाजपच्या आंदोलनानंतर नितीन राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर टीकास्त्र सोडलं.

कोरोना काळात आणि आताही महाविकास आघाडी सरकार जनतेसाठी काम करत आहे. कोरोना काळात 24 तास वीज पुरवठा करण्यासाठी आमच्या कर्मचाऱ्यांनी चांगलं काम केल्याचा दावा ऊर्जामंत्र्यांनी केलाय. तसंच वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी ग्राहकांसोबत असभ्य वर्तन केल्याचा आरोप भाजप करत आहे. पण आम्ही असं काहीही केललं नाही. फक्त नोटीसा दिल्या आहेत. वाढीव बिल आले असेल तर त्यांना हप्ते पाडून देण्याची सवलत दिली. ग्राहक कार्यालयात आल्यास त्यांचंही समाधान केलं जात आहे. आम्ही मागितलेली मदत केंद्रानं दिली असती तर वीज बिलमाफी बाबत विचार करता आला असता, असंही ऊर्जामंत्री म्हणाले.

चुकलं तर माफ करा, पण वीज बिल भरा!

भाजपचे हे आंदोलन म्हणजे फसवणूक आहे. केंद्र सरकार आम्हाला कोळसा आणि वीज निर्मितीसाठी लागणारं साहित्य देणार का? असा सवालही राऊत यांनी विचायरलाय. भाजप आणि केंद्र सरकारच्या असंवेदनशील वागण्यामुळे महावितरण अडचणीत आहे. ग्राहक हा आमच्यासाठी देवासारखा आहे. आमचं चुकलं असेल तर माफ करा. पण वीज वापरली असेल तर बिल भरावंच लागेल, अशी हतबलताही ऊर्जामंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

राज्यभरात भाजपनं जे आंदोलन केलं ते फसवं ठरलं आहे. भाजपच्या या आंदोलनाला प्रतिसाद मिळाला नाही. 79 टक्के लोकांनी बिल भरलं असल्याचा दावा ऊर्जामंत्र्यांनी केलाय. ज्या प्रमाणे मागील निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. त्यातून बाहेर निघण्याचा ते केविलवाणा प्रयत्न करत असल्याचा टोलाही राऊतांनी लगावलाय.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button