breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘ट्रेलर, टिझर काहीही नाही डायरेक्ट शिवतीर्थवर सिनेमाच’; राज ठाकरे

गुडीपाडव्याला राज ठाकरेंची तोफ कुणावर धडाडणार?

मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मनसेचे एका आमदाराने उद्या पक्ष ताब्यात घेतला तर काय? असं वक्तव्य केलं होतं. यावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सूचक प्रत्युत्तर दिलं आहे.

राज ठाकरे म्हणाले की, म्हातारी मेल्याचं दु:ख नसतं पण काळ सोकवतो. २२ मार्चला मी माझी सविस्तर भूमिका मांडतो. जे काही घडलं त्याचा ट्रेलर, टिझर नाही काहीही नाही डायरेक्ट सिनेमाच दाखवायचा आहे, असं राज ठाकरे म्हणाले. आत्ता मी या विषयावर काही बोलणारच नाही. महाराष्ट्रांचं जे काही राजकारण सुरू आहे त्यात इतकंच म्हणेन की राजकारणाचा चिखल झाला आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राचं अनावरण झालं त्यावेळी विधानसभेत गेलो होते. मला कळतच नव्हतं की कोण कुठल्या पक्षात आहे. आमदार आहे असं कुणी सांगत आलं की कुठला? एखाद्या आमदाराला विचारलं तू त्या पक्षात होतास ना? पण तो त्या पक्षात गेला ना असं सांगितलं जातं, असं राज ठाकरे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button