breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

नवरदेव नवरीने केला ‘लग्नाचा करारनामा’, सहा अटींचा करारनामा

पुणे जिल्ह्यात पार पडला हटके विवाह सोहळा

पुणे : आंबेगाव तालुक्यातील गावडेवाडी येथील कृष्णा लंबे हा मुलगा आणि जुन्नर तालुक्यातील सायली ताजने ही मुलगी यांचा मंचर येथे विवाह सोहळा पार पडला. मात्र हा लग्न सोहळा पडताना एक करार करण्यात आला. या करारामध्ये सहा प्रश्न ठेवण्यात आले होते. ते मान्य झाल्यानंतर हा विवाह पार पडला.

विशेष म्हणजे या करारनाम्यवर साक्षीदार म्हणून त्यांच्या मित्र आणि मैत्रिणींच्या स्वाक्षरी देखील केल्या आहेत. लग्नाच्या बंधनात अडकताना नाव दमात्यांनी एकमेकांच्या अटी करारनाम्यात ठेवल्या होत्या. त्यानंतर त्यांनी हा विवाह केला आहे. या विवाह सोहळ्याची राज्यभर चर्चा रंगू लागली आहे.

“लग्नाचा करारनामा”

कृष्णा : सायलीचे म्हणणे नेहमी बरोबरचं असेल…!

सायली : मी कृष्णाकडे शॉपींगसाठी हट्ट धरणार नाही…!

सायली : मी कृष्णाला मित्रांबरोबर फिरायला, पार्टीलाजायला आडवणार नाही. (महिन्यातून दोन वेळा)

कृष्णा : मी सायलीची आणि आई वडिलांची ही सेवा करेल…!

सायली : मी कृष्णाचे मित्र घरी आल्यानंतर त्यांच्यासाठी स्वतःच्या हाताने जेवण बनवेल…!

आमच्यात वादविवाद झाले तरी ते आमचे आम्ही एक दिवसात मिटवू.

या सहा अटींवर या दाम्पत्याने एकमेकांशी जोडण्याचा निर्णय घेतला. या विवाह सोहळ्याची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. सहा अटी आणि त्यानंतर झालेला हा विवाह सोहळा सद्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button