breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

शेतकऱ्यांची चिंता वाढली! कुठे कडक उष्णता तर कुठे पावसाचा इशारा

पुणे | गेल्या काही दिवसांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अशातच आजही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. आज मुंबईसह ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदूर्ग या ठिकाणी उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे.

पुण्यासह राज्यातील ११ जिल्ह्यांना सलग दुसऱ्या दिवशी वादळी वारा आणि ढगांच्या गडगडाटासह आज पाऊस पडण्याचा ‘यलो अलर्ट’ हवामान खात्याने दिला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ढगाळ हवामान होत असून नांदेड, परभणी, जालना, अमरावती, वर्धा जिल्ह्यांत वादळी पावसाने तडाखा दिला आहे.

हेही वाचा    –      मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज १२ ते २ ब्लॉक, पाहा पर्यायी मार्ग 

उष्ण व दमट हवामानाचा इशारा (येलो अलर्ट) :

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

जळगाव, अहमदनगर , पुणे, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, वाशीम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button