breaking-newsताज्या घडामोडीपुणे

जिल्ह्यातून १,६६२ मतदारांनी दिली टपाली मतदानास पसंती

पुणे : पुणे, बारामती, मावळ आणि शिरुर या चारही लोकसभा मतदारसंघातील ८५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेले मतदार व दिव्यांग मतदार यांच्यासाठी घरीच टपाली मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेसाठी मतदारांना १२ ड हा अर्ज भरून देणे आवश्यक होते.

त्यानुसार या चारही मतदारसंघातील ८५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या १ हजार ३९७ मतदारांनी तर २६५ दिव्यांग मतदार असे एकूण १ हजार ६६२ मतदारांनी घरातून मतदान करण्यास पसंती दिली आहे. यामुळे मतदानाची टक्केवारी वाढून वयस्कर मतदारांना मतदान करणे सोपे होणार आहे.

हेही वाचा – मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज १२ ते २ ब्लॉक, पाहा पर्यायी मार्ग

सर्व स्तरातील मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजाऊन राष्ट्रीय कार्यात सहभाग घ्यावा, यासाठी निवडणूक आयोगाकडून प्रयत्न सुरू आहेत. मतदानाचे प्रमाण वाढावे, यासाठी ८५ वर्षेपेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांच्या तसेच शारीरिक विकलांग मतदारांच्या घरी जाऊन निवडणूक टपाली मतदानावर भर दिला जात आहे.

त्यासाठी अशा मतदारांची यादी निश्चित करून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी त्यांच्या घरी भेट देऊन टपाली मतदान करणार अथवा मतदान केंद्रांवर जाऊन मतदान करणार याबाबतची माहिती घेतली. यामध्ये अनेक मतदारांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रांवर जाऊन मतदान करणार असल्याचे सांगितले. तर काही मतदारांनी टपाली मतदान करणार असल्याचे सांगितले.

अशा मतदारांकडून १२ ड अर्ज भरून घेण्यात आला आहे. त्यामुळे अर्ज केलेल्या मतदारांना टपाली मतदानाचा लाभ घेता येणार आहे. मतदान करण्यासाठी मतदान अधिकाऱ्यांना संबधितांच्या घरी पाठवून त्यांचे मत नोंदविले जाणार आहे. त्यासाठीचे आवश्‍यक ते प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना दिले आहे आहे. या कामकाजासाठी प्रत्यक्ष अशा मतदारांच्या घरी जावून त्यांचे मतदान घेणेसाठी विधानसभानिहाय पथकांची नियुक्ती केली आहे.

या पथकामध्ये पथकप्रमुख तथा मतदान अधिकारी क्र.1 म्हणून सेक्‍टर ऑफीसर, मतदान अधिकारी क्र. २ म्हणून महसूल कर्मचारी यांची नियुक्ती असणार आहे.. या कामकाजावर निरीक्षण ठेवण्यासाठी मायक्रो ऑब्झर्व्हर, मतदान प्रक्रियेचे चित्रीकरण करण्यासाठी व्हिडीओग्राफर व पोलीस कर्मचारी यांचा पथकामध्ये समावेश असणार आहे. गोपनियतेचा भंग होणार नाही, असा पध्दतीने टपाली मतदानाचे व्हिडीओ शुटींग केले जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button