breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

अवधूत, वैशाली, स्वप्नील आणि चिंतामणी सोहोनी यांचा ‘कोकणचा गणपती’; सागरिकाचा नवा म्युझिक व्हिडिओ

गणपती बाप्पाचं आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेलं आहे . बाप्पाच्या आगमनाची तयारी प्रत्येक घरात, राज्यात नव्हे तर तर जगात जेथे कुठेही बाप्पाचे भक्त आहेत तेथे सुरु झाली आहे. गणपती बाप बुद्धीची, विद्येची आणि कलेचं दैवत आहे. संगीत क्षेत्रासाठीही बाप्पा म्हणजे एक पर्वणी असते. बाप्पाची नानाविध रूपं आहेत. नानाविध प्रकारे बाप्पाची पूजा केली जाते. कोकणातील लोकांसाठी हा गणपतीचा म्हणजेच चतुर्थीचा सण अगदी जिव्हाळ्याचा, आपुलकीचा आणि अभिमानाचा विषय असतो आणि म्हणूनच मुंबईतले सगळे चाकरमानी गणपतीसाठी अगदी जय्यत तयारी करून कोकणची वाट धरतात.

संगीत क्षेत्रात आपले वैविध्य आणि वेगळंपण नेहमीच जपणाऱ्या सागरिका म्युझिकने हे पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. या वर्षी सागरिका म्युझिक रसिकांसाठी कोकणचा गणपती घेऊन आले आहेत. हो “कोकणचा गणपती ” हे गाणं ऑडिओ आणि विडिओ या रूपात सागरिका आपल्यासाठी घेऊन आले आहेत.

चिंतामणी सोहोनी यांनी या गाण्याचं संगीत दिग्दर्शन केलं आहे आणि गायलं हि आहे. चिंतामणी सोबत या गाण्यात महाराष्ट्रातील ३ सुप्रसिद्ध गायक वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर आणि अवधूत गुप्ते यांनी आपला स्वरसाज या गाण्याला दिला आहे. रघुनाथ मतकरी यांनी या गाण्याचे शब्द लिहिले आहेत.

सागरिका दास यांनी दिग्दर्शन केलेल्या या गाण्याचा व्हिडिओ सुद्धा अगदी कोकणातल्या गणपती उत्सवाची आठवण करून देतो. कोकणातली घरगुती गणपतीची सजावट इत्यादी पाहून आपणही अगदी कोकणात असल्याचं वाटतं .या गाण्याचा ऑडिओ ६ सप्टेंबरपासून सर्व streaming प्लॅटफॉर्म्स वर ऐकायला मिळेल तर चिंतामणी सोहोनी, वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर आणि अवधूत गुप्ते यांच्यावर चित्रित केलेला व्हिडिओ ७ सप्टेंबरला सागरिका म्युझिकच्या मराठी YouTube channel वर पाहता येईल .

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button