कात्रज परिसरात बनावट स्कॉचच्या कारखान्यावर छापा
पुणे : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कात्रज परिसरात देहू रोड बायपास आंबेगाव येथे बनावट स्कॉचच्या कारखान्यावर छापा टाकण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज देहू रोड बायपास, या ठिकाणी छापा घातला असता, या ठिकाणी बनावट परदेशी स्कॉचच्या एकूण ३४ सिलबंद बाटल्या, ५५१ रिकाम्या बाटल्या, बाटल्यांचे बुचे, दोन दुचाकी वाहने, मोनोकार्टून, हिट गन (हेअर ड्रायर), इंडक्शन (शेगडी), प्लॉस्टिक पॅकिंग रोल, प्लॉस्टिक चिकटपटटी आणि मोबाईल फोन असा एकुण अंदाजे १० लाख ३९ हजार ४७४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.महेशभाई हरिभाई कोळी (रा. मंगळवार पेठ, पुणे ) याला पोलिसांनी अटक केली आहे.
@CPPuneCity @PuneCityPolice @stateexcise #stateexcise #pune #punenews
Fake Scotch Factory in Pune | खळबळजनक… पुण्यात बनावट स्कॉच कारखाना : राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई https://t.co/ko9lflo8Zk— maharashtramirror (@maharashtramir2) January 13, 2024
हेही वाचा – अटल सेतू पुलावरून प्रवास करताना किती टोल भरावा लागणार? वाचा सविस्तर..
मद्य पार्सलद्वारे मुंबई व इतर शहरामध्ये पाठविले जात होते तसेच दुचाकीचा वापर करून पुणे शहरात त्याची विक्री केली जात होती, परदेशी बनावटीचे मद्य वापरण्यात आलेल्या रिकाम्या बाटल्यातून पुन्हा भरून त्याची विक्री केली जात होती अशी माहिती आरोपीने दिली आहे.
पोलीस निरीक्षक, आर.पी.शेवाळे, दुय्यम निरीक्षक एन.एन. मारकड, सहायक दुय्यम निरीक्षक एस.एस. लोहकरे, एस.एस. इंदलकर जवान-नि-वाहनचालक, जवान शरद भोर, गोपाल कानडे, व महिला जवान उज्वला भाबड यांनी ही कारवाई केली. याचा पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क सी विभागाचे निरीक्षक राजाराम प्रभु शेवाळे हे करीत आहेत.