breaking-newsलेख

नविन वर्ष आहे… मग काय,नविन संकल्प….


2019 ला बाय बाय म्हणण्याची वेळ अखेर जवळ आलीये… किती भुर्रकन गेलं ना हे वर्ष..आणि अचंबित करणारही..म्हणजे अगदी राजकारणापासून ते निसर्गापर्यंत..सर्वच विचित्र आणि थक्क करणार…म्हणजे त्यात उल्लेख करायचं म्हटलं तर जम्मु-काश्मिरमध्ये 370 कलम हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय,त्यानंतर राष्ट्रवादी संपतेय की काय असं वाटत असतानाचं सिनेमाच्या सुरवातील वेड्याचा सोंग घेतलेला एखादा व्यक्ती अचानक इंटरवल नंतर CBI ऑफिसर निघतो..तसंच काहीसं राष्ट्रवादीच झालं. विधानसभेच्या निवडणुकींचा निकाल लागल्यावर राष्ट्रवादी हिरो बनली…सलाम त्या 80 वर्षाच्या तरुणाला ज्याने सिनेमाचा क्लायमॅक्सच बदलला…आणि सर्वात वाईट आठवण म्हणजे पुरपरिस्थिती आणि त्यामुळे झालेली लोकांची आणि शहरांची दैनिय अवस्था…लाखो लोकांचे संसार ,आणि शहरच्या शहर-गावंच्या गावं पाण्याखाली होते,उद्धवस्थ झाले …किती जणांचे निष्पाप बळी यात गेले… निसर्गाने जणू कोपण्याचा निर्णयच घेतला होता…याला कोण जबाबदार ? एवढच काय कमी होत म्हणून नागरिकतत्व सुधारणा कायद्यामुळे जे काही युद्ध सुरु झालंय ते तर, दहा पट्टींनी देशाच्या हिंसाचारामध्ये वाढ देणार आणि गोंधळ निर्माण करणार ठरतयं…आशा आहे की 2019 मध्येच हा गुंता सुटावा त्याची सावली नविन वर्षावर नको…
असो पण हे 2019 वर्ष चांगल ,वाईट, आणि बरेच सुखद आणि दुख:द धक्के देणारच ठरलं…आता 2020 येतयं तर त्याचं स्वागत तर करायलाचं हव….त्यामुळे
“भूल जा जो हुआ उसे भूल जा
है कसम तुझे मुस्कुरा
खुद को यूँ ना दे तू सज़ा
उन यादों को तू भूल जा”

असं म्हणायचं आणि पुढे निघायचं…

बर , 2020 चं स्वागत तर आपण सर्वच अगदी जंग्गी करूच…पण त्यासोबत काही नविन संकल्पही करू…आणि प्रत्येकजण करतात..हा! आता ते केलेले संकल्प किती दिवस आपण पाळू हे नाही सांगता येत… पण करु तरी…प्रत्येकांचे संकल्प किती वेग-वेगळे आणि विचित्र असतात ना…म्हणजे कोणी वजन कमी करायचा संकल्प करत,तर कोणी वजन वाढवायचं,कोणी चांगला अभ्यास करुण चांगले गुण मिळवायचा संकल्प करत, कोणी गोड बोलायच,तर कोणी चांगल्या जॉबचं ,एक ना अनेक असे संकल्प करतात…मला काय वाटत माहितीये का आपणना असे दोन-तिन हटके संकल्प नक्कीच केले पाहिजे जसं की, स्वत:ला स्टेबल ठेवण्याचा प्रयत्न करूया..स्टेबल म्हणजे नौकरी ,घर मिळवण्यावालं स्टेबलं नाही..तर आपल्या मनाला आणि बुद्धीला स्टेबल करणं आणि दुसरा म्हणजे ‘नाही ‘ म्हणणं …थोड विचित्र वाटेन पण हे संकल्प करण्याची खरच गरज आहे…कारण कसं होत ना की जिथे आपण मनाने विचार करतो ना तिथे बुद्धी बंद पडते आणि जिथे बुद्धीने चालतो तिथे मन मात्र कमजोर पडत..त्यामुऴे निर्णय एक तर तटस्थपणे घेतले जातात किंवा भावनिक घेतले जातात…आणि हे दोन्ही चुकीचचं आहे..बुद्धी आणि मन यांचा समतोल आपल्याला सांभाळता आला पाहिजे…ते जमल ना की जे योग्य आहे तेच आपल्यापर्यंत पोहचत…नाहीतर मग अशा खुप गोष्टी समोर येतात की नाईलाजाने आपल्याला स्विकाराव्या लागतात..आणि म्हणून कधी कधी नाही म्हणनं ही शिकायला हवं…तिसरा म्हणजे आपल्या वर्तूळाच्या थोड बाहेर पडणं..गेले अनेक वर्षे आपण सतत एकाच वर्तूळात राहिलेलो असतो म्हणजे तिच लोक,तिच मतं, तेच काम ,त्य़ाच जागा ,तेच तेच आणि तेच….नविन असं नाहीच काही…आपल्याला त्यातून बाहेर पडण्याची भिती वाटत असते किंवा ते वर्तूळ आपल्यासाठी एक कम्फर्टझोन बनलेलं असतं…त्यामुळे त्याच्या बाहेर जाण आपल्याला पचत नाही आणि रुचतही नाही … त्यामुळे आपल्या भोवती असलेल्या अनेक नविन आणि सुंदर गोष्टींपर्यंत आपण पोहचतच नाही …आणि मग परत त्याच त्याच रटाऴ गोष्टींचा शीन आला म्हणून तक्रार करतो..आयुष्यात काय नविन नाहीच असा शंख फुकत बसतो..पण आपण स्वत:ला त्यापासून लांब ठेवतो हे आपल्या लक्षात येत नाही. मी तर म्हणते ,नविन वर्षात प्रॉब्लेम पण नविनच हवे ,जुने प्रॉब्लेम जून्याच वर्षात सोडवूण किंवा सोडून यायचे…भिजतं घोंगड किती दिवस वागवायचं…

आपल्या कम्फर्ट वर्तूळातून बाहेर पडून तर बघा, काय आणि किती नविन परवाने आपल्याला मिळतीलं,,एवढच काय माणसंही नविन भेटतील…याचा अर्थ आपल्या माणसांचा कंटाळा आलाय असं नाही…पण तेच चेहरे, तेच स्वभाव,त्याच सवयी अवती-भोवती राहिल्या की त्या नात्यात किंवा त्या माणसांबाबत थोडासा मरगऴपणा येणारच ना …निसर्गाचा नियमच आहे तो आपल्या स्वभावाच्या रसायनातला…त्याच नात्यांना पुन्हा नविन कलाटनी नविन चेहरा ,नविन भावना देण्यासाठी बाहेर पडणं खरच गरजेच आहे.. ऑफिसमध्ये सतत एकाच जागी काम करून आपल्याला एवढा कंटाळा येतो की तो लॅपटॉप किंवा कंप्यूटर डोळ्यांसमोरही नकोसा वाटतो..तेव्हा आपण ऑफिस किंवा काम सोडून घरी नाही जात ना…थोड बाहेर एक चक्कर टाकून येतो, नाहीतर मस्त मसालेदार चाह मारतो त्यामुळे तेव्ही जी तरतरी येतेना ती अगदी घरी जाईपर्यंत शाबूत असते…ख-या आयुष्यातही तोच नियम लागू होतो…हा पण या वर्तूळाच्या बाहेर पडताना एकटेच पडा…कोणावर अवलंबून राहू नका..कारण तुम्हाला इतरांची नाही तुमची मरगळ दूर करायची आहे…त्यात तुम्हाला तुमची स्पेस हवी,कारण तुम्ही मनाने फ्रेश असालं तर बुद्धी फ्रेश राहिलं.. नाहीतर त्याच्यावर जमा झालेली रागाची, ईर्शेची,स्पर्धेची , वाईट -नकारात्मक विचारांची जऴमट कशी दूर होणार…नविन वर्षात नविन आंबट – गोड क्षणांची चव चाखून बघुयात… त्यामुळे त्या क्षणी तरी स्वत;ची सोबत स्वत: बना आणि नविन प्रवासाला निघा .नविन प्रवास म्हणजे कुठेतरी लांब जाण्याची गरज नाही…फक्त त्या वर्तूळा बाहेर जरी डोकावलं तरी लक्षात येईल किती नविन वाटा आपली वाट पाहतायत..त्या स्विकारायच्या आहेत बस… मग बघा नविन वर्ष किती काही नविन देऊ करेलं…याचाच अर्थ हे तीन संकल्प एकमेकांशी संलग्न आहेत …कारण मनाला आणि बुद्धीला स्टेबल ठेवलं तर तुमचा दृष्टीकोण नक्कीच व्यापक आणि स्वतंत्र बनेलं त्यामुळे तुमचं जग नक्कीच विस्तारेलं…आपण ऩ पाहिलेलं जग खुप सुंदर आहे त्याचा नक्की मनमुराद आस्वाद घेऊया… त्यासाठी काही गोष्टींना नाही म्हणायला लागलं तर नक्की म्हणूया… हे संकल्प जरी पाळले तरी नविन वर्ष आपल्याला हव्या त्या मनासारख्या आठवणी देऊन जाईलं…तर, येणा-या नविन वर्षाच्या तुम्हाला ‘मटरगश्ती’ शुभेच्छा…

“यूँ ही चला चल राही
कितनी हसीन है ये दुनिया
भूल सारे झमेले, देख फूलों के मेले
बड़ी रंगीन है ये दुनिया…..
आँसू की नदियाँ भी हैं
ख़ुशियों की बगियाँ भी हैं
रास्ता सब तेरा तके भैया”….

( मयुरी सर्जेराव )

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button