breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

अटल सेतू पुलावरून प्रवास करताना किती टोल भरावा लागणार? वाचा सविस्तर..

Atal Setu Bridge Mumbai | महाराष्ट्रातला बहुप्रतिक्षित मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प म्हणजेच अटल बिहारी वाजपेयी स्मृती न्हावाशिवा अटल सेतू आजपासून सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला आहे. अटल सेतू पुलावरून प्रवास करताना किती टोल भरावा लागणार? वाचा सविस्तर..

कार/चारचाकी : देशातील सर्वात मोठ्या सागरी पुलावरून चारचाकी वाहनाला एका बाजूने प्रवास करण्यासाठी २५० रुपये टोल आकारला जाणार आहे. तर दोन्ही बाजूंनी वाहतुक (Atal Setu Toll) करण्यासाठी अवघे ३७५ रुपये मोजावे लागणार आहे. तसेच सरकारने दैनंदिन प्रवास करणाऱ्यांसाठी पासची देखील व्यवस्था केली आहे. त्यामुळे नियमित पाससाठी ६२५ तर मासिक पाससाठी १२ हजार ५०० रुपये असा टोल आकारण्यात येणार आहे.

मिनीबस : अटल सेतू पुलावरून मिनीबसने एकाबाजूने प्रवास करण्यासाठी ४०० तर दोन्ही बाजूंच्या वाहतुकीसाठी ६०० रुपये टोल आकारलाजाणार असल्याचे दिसत आहे. तसेच मिनीबसला महिन्याच्या  पाससाठी १ हजार तर मासिक पाससाठी २० हजार रुपये इतका टोल भरावा लागणार आहे.

हेही वाचा    –    राम मंदिरात रामाची मूर्ती असेल ना? उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना टोला

छोटे ट्रक/वाहने : व्यापाऱ्यांसाठी लागणाऱ्या छोट्या वाहनांना एका बाजूने वाहतुकीसाठी ८३० रुपये लागणार आहेत. तर दोन्ही बाजूच्या वाहतुकीसाठी १२४५ रुपये इतका टोल द्यावा लागेल. अशातच दैनंदिन पाससाठी २०७५ तर महिन्याच्या पाससाठी ४१ हजार ५०० रुपये इतका दर द्यावा लागणार आहे.

एमएव्ही (3 एक्सेल) : एमएव्ही या प्रकारच्या वाहनांसाठी एका बाजूच्या वाहतुकीसाठी ९०५ रुपये टोल भरावा लागणार आहे. तर दोन्ही बाजूच्या वाहतुकीसाठी १३६० रुपये इतका टोल आकारला जाणार आहे. याशिवाय महिन्याच्या पाससाठी एकाबाजूने प्रवास करायचा असेल २२६५ तर मासिक पाससाठी ४५ हजार २५० रुपये इतका टोल द्यावा लागेल.

मोठे ट्रक/वाहने (4-6 एक्सेल) : मोठे ट्रक/वाहने अशा वाहनांना एका बाजूने १३०० रुपये टोल द्यावा लागेल. तर दोन्ही बाजूंने प्रवास करणार असाल तर १९५० रुपये इतका टोल आकारला जाणार आहे. याशिवाय  दैनंदिन पाससाठी ३२५० रुपये आणि मासिक पाससाठी ६५ हजार रुपये टोल भरावा लागेल.

अवजड वाहने : या प्रकारच्या वाहनांसाठी सागरी पुलावर एका बाजूने १८५० रुपये टोल भरावा लागेल. तर  दोन्ही बाजूंसाठी २३७० इतका टोल भरावा लागणार आहे. तसेच या वाहनांना दैनंदिन पाससाठी ३९५० रुपये टोल भरावा लागणार आहे. याशिवाय मासिक पाससाठी अवजड वाहनांना ७९ हजार रुपये टोल भरावा लागणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button