breaking-newsताज्या घडामोडीपुणे

मराठी साहित्य संमेलनासाठी पुण्यातून दिल्लीला ट्रेन; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती

पुणे :  केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. आता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन थेट दिल्लीमध्येच होत आहे. त्यामुळेच या महोत्सवला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे.साहित्यप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी असून दिल्लीमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाला जाण्यासाठी केंद्र सरकारने विशेष ट्रेनची सोय केली आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले.

आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पुणे-दिल्ली-पुणे विशेष रेल्वेची व्यवस्था !देशाच्या राजधानीत म्हणजेच दिल्लीत ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात येत असून ही समस्त मराठीजनांसाठी अभिमानाची बाब आहे. २१, २२ आणि २३ फेब्रुवारी २०२५ रोजी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो साहित्यिक सहभागी होणार आहेत.

हेही वाचा –  ‘एकनाथ शिंदे, अजित पवार यांचं काम आता झालय’; संजय राऊत

यानिमित्ताने साहित्यिकांच्या प्रवासाच्या सोयीसाठी पुणे ते नवी दिल्ली दरम्यान १९ फेब्रुवारी २०२५ रोजी आणि नवी दिल्ली ते पुणे दरम्यान २४ फेब्रुवारी २०२५ रोजी विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात यावी, अशी विनंती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव जी यांच्याकडे केली. माझ्या विनंतीचा मान राखून त्याची सकारात्मक दखल घेत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी विशेष गाडीची तरतूद करण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना वैष्णव जी यांनी दिल्या आहेत.

वैष्णव जी यांच्या या सकारात्मक पावलाबद्दल समस्त साहित्यिकांच्या आणि मराठीजनांच्या वतीने मी मनःपूर्वक आभार मानतो! मराठी भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा आणि देशाच्या राजधानीत होत असलेलं हे संमेलन निश्चितच प्रत्येक मराठी माणसाला आनंद देणारे असणार आहे.

अशी पोस्ट केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे. एकीकडे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने समाधान व्यक्त होत असतानाच दुसरीकडे दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. त्यासाठी केंद्र सरकारने विशेष रेल्वेगाडीची सोयदेखील केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button