Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

१५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचा विश्वविक्रम; टी-२० क्रिकेटमध्ये ‘असा’ कारनामा करणारा जगात पहिलाच!

Vaibhav Suryavanshi | राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने आपल्या फलंदाजीने आयपीएल २०२६ (IPL 2026) मध्ये धुमाकूळ घातला आहे. लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात एकापेक्षा एक उत्कृष्ट फटके मारत १५ वर्षांच्या या ‘बॉस बेबी’ने क्रिकेट जगतात नवा इतिहास रचला आहे. एकाच आयपीएल हंगामात ५०० धावा पूर्ण करणारा तो जगातील सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. या ऐतिहासिक कामगिरीसह त्याने भारताचा स्टार यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत याचा मोठा विक्रम मोडीत काढला आहे.

जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात वैभवला हा विक्रम गाठण्यासाठी केवळ १४ धावांची गरज होती आणि त्याने अवघ्या १४ चेंडूंमध्येच हा टप्पा पार केला. यापूर्वी, आयपीएलच्या एका हंगामात ५०० धावा करणारा सर्वात तरुण खेळाडू म्हणून ऋषभ पंतच्या नावावर विक्रम होता, जो त्याने २०१८ मध्ये केला होता. आता अवघ्या १५ व्या वर्षी वैभवने हा मान मिळवून जगात कोणालाच जमला नाही असा पराक्रम केला आहे.

हेही वाचा

PM मोदींना प्रश्न विचारणं पडलं महागात! नॉर्वेच्या पत्रकाराचे सोशल मीडिया अकाऊंट्स निलंबित

५० षटकार मारणारा पहिला भारतीय फलंदाज!

या सामन्यात वैभव सूर्यवंशीने लखनौच्या गोलंदाजांना पुरते हैराण केले. त्याने अवघ्या २३ चेंडूंमध्ये आपले झंझावाती अर्धशतक पूर्ण केले. या सामन्यापूर्वी वैभवने आयपीएल २०२६ मध्ये ४३ षटकार मारले होते. लखनौविरुद्धच्या लढतीत त्याने तब्बल १० षटकार खेचले. यासह एकाच आयपीएल हंगामात ५० हून अधिक षटकार मारणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.

ख्रिस गेलचा ‘तो’ महाविक्रम निशाण्यावर

या सामन्यात वैभव ७ चौकार आणि १० उत्तुंग षटकारांसह ९३ धावांवर बाद झाला. या वादळी खेळीमुळे त्याच्या एकाच हंगामातील एकूण षटकारांची संख्या आता ५३ वर पोहोचली आहे. या कामगिरीनंतर आता वैभव सूर्यवंशीला ‘युनिव्हर्स बॉस’ ख्रिस गेलचा विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी आहे. आयपीएलच्या एकाच हंगामात सर्वाधिक ५९ षटकार मारण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. वैभवचा सध्याचा फॉर्म पाहता तो हा विक्रमही लवकरच मोडीत काढेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button