‘एकनाथ शिंदे, अजित पवार यांचं काम आता झालय’; संजय राऊत
मुंबई : “विधानसभेचे निकाल जरी आम्हाला मान्य नसले, निकालात गडबड, घोटाळे आहेत हे आम्ही वारंवार दाखवून देतोय. शेवटी लोकशाहीत आकडा महत्त्वाचा आहे. पुण्यात बाबा आढाव यांच्यासारख्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता वयाच्या 95 व्या वर्षी निकालाविरुद्ध, लोकशाही वाचवण्यासाठी आत्मक्लेष आंदोलन करतोय. कष्टकरी, वंचित, रिक्षावाले. हमाल यांच्यासाठी बाबा आढाव यांनी आपलं आयुष्य वेचलं. त्यांना वयाच्या 95 व्या वर्षी लोकशाही रक्षणासाठी, ईव्हीएम घोटाळ्याविरुद्ध आत्मक्लेष करावा लागतोय. त्याच्यातच निकालाच रहस्य दडलेलं आहे. महाराष्ट्रातील समाज हळूहळू बाबा आढावा यांच्यामागे उभा राहिलं” असं विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.
हेही वाचा – मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित? आज मुंबईत बैठका, राजकीय घडामोडींना वेग
“एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडून आता भाजपने आपलं काम करुन घेतलय. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तोडण्यासाठी मदत घेतली. त्यांचं कार्य आता संपलं आहे. भविष्यात त्यांचे पक्ष फोडून बहुमत मिळवल्यास आश्चर्य वाटणार नाही” असं संजय राऊत म्हणाले.
“अजित पवार हे कायम उपमुख्यमंत्री आहेत. ते सैदव उपमुख्यमंत्री आहेत. अजित पवार यांच्या चेहऱ्यावर हास्य पाहतो काल गॉगल वैगेरे लावून फिरत होते. पण लोकसभेच्या निकालानंतर त्यांचा चेहरा उतरला होता. आता त्यांचे चेहरे फुलले आहेत. ईव्हीएमची त्यांनी पूजा केली पाहिजे. एक मंदिर EVM आणि दुसरं मंदिर मोदी-शाह यांचं आहे” असं संजय राऊत म्हणाले.