जी आडनावं भारतामध्ये सर्वाधिक; अशा कॉमन नावाची माहिती घेणार आहोत
काही आडनाव ही गमतीदार त्यावरून अनेकदा विनोद देखील होतात. तर काही आडनाव हे भारदस्त असतात.

पुणे : व्यक्तीची ओळख ही त्याच्या आडनावावरून होतं असते. माणूस जन्माला आला की त्याचं नाव ठेवलं जातं. मात्र तो कोणत्या कुटुंबामध्ये जन्माला आला त्यावरून त्याचं आडनाव ठरतं. अनेकदा आडनावावरून त्या व्यक्तीची जात देखील ठळकपणे दिसून येते. आपलं आडनाव काय असावं हे त्या व्यक्तीच्या हातामध्ये नसतं. मात्र आता अनेकजण आपलं आडनाव देखील बदलतात. काही आडनावं अशी असतात की त्या आडनावरून त्या व्यक्तीच्या जातीची ओळख होत नाही. उदाहरण द्यायचं झाल्यास समजा एखादा व्यक्ती एखाद्या गावामध्ये राहात असेल तर त्या गावाची ओळख सांगणारं आडनाव तो व्यक्ती आपल्या नावाच्या पुढे लावतो. जसं की नाशिककर, नागपूरकर इत्यादी. तर काही लोकांना आपलं आडनाव युनिक असावं असं वाटत असतं. त्यामुळे ते देखील काही जण आपलं आडनाव बदलतात.
हेही वाचा – देवगड आंब्यावर टँपर प्रूफ युआयडी
भारताचा विचार केल्यास या खंडप्राय देशामध्ये जवळपास चाळीस लाखांपेक्षाही जास्त आडनावं तुम्हाला आढळून येतील. काही आडनाव ही गमतीदार असतात. त्यावरून अनेकदा विनोद देखील होतात. तर काही आडनाव हे भारदस्त असतात. अशी आडनावं कॉमन असली तर त्याचा एक वेगळा प्रभाव असतो.
आज आपण अशा कॉमन नावाची माहिती घेणार आहोत, जी आडनावं भारतामध्ये सर्वाधिक लोकांची आहेत. भारतामध्ये तुम्हाला जवळपास चाळीस लाखांपेक्षाही जास्त आडनावं आढळू येतील. मात्र त्यातील अशी काही आडनावं आहेत, जी दहा लोकांपैकी एकाचं तरी असतंच असतं. देशातील सर्वात कॉमन आडनाव म्हणजे कुमार हे आहे. कुमार हे नाव तुम्ही कोणत्याही राज्यामध्ये जा तिथे तुम्हाला आढळून येणार. कुमार हे आडनाव देशातील सर्वात कॉमन आडनाव आहे. या आडनावाचे माणसं तुम्हाला सर्वत्र आढळून येतात. काही मुली आपल्या नावाच्या पुढे कुमारी असं नाव देखील लावतात. तर कही जणी देवी असं देखील नाव लावतात, ही आडनावं देखील भारतामध्ये खूपच कॉमन आहेत. त्यामुळे कुमार हे आडनाव भारतातील सर्वात जास्त लोकांचं असावं असा अंदाज आहे.