ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवड

मोशी कचरा डेपो दुर्घटना : मोशी कचरा डेपो दुर्घटनेबाबत कंपनी विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांचे आदेश

पिंपरी :  मोशी कचरा डे पो दुर्घटनेबाबत प्राथमिक चौकशी चे काम तातड़ी ने पूर्ण करावे व संबंधित कंपनी विरुद्ध गुन्हा दाखल करावा अशा सूचना आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी अधिकाऱ्याना दिल्या.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी आज मोशी कचरा डेपो दुर्घटनेसंदर्भात महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, सह आयुक्त मनोज लोणकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा –  ना कॅश, ना क्रेडिट कार्ड, पीएम मोदी परदेशात पेमेंट कसे करतात?

८ जुलै रोजी दुपारी दीडच्या सुमारास मोशी कचरा डेपो येथे इमारतीवर कचऱ्याचा ढीग कोसळून दुर्घटना घडली. या इमारतीत व इमारतीबाहेरील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ, भारतीय सेना, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पीएमआरडीए अग्निशमन दल, पोलीस प्रशासन तसेच इतर संबंधित यंत्रणांकडून बचावकार्य सुरू करण्यात आले होते. घटना घडल्यानंतर लागलीच पाच नागरिक स्वतः बाहेर आले होते. उर्वरित १८ नागरिकांपैकी ९ नागरिकांना दुर्घटनाग्रस्त इमारतीतून बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button