Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लाडक्या बहि‍णींना जून महिन्याचे 1500 कधी मिळणार? संभाव्य तारीख समोर

Ladki Bahin Yojana : राज्यातील लाडकी बहिण योजनेअंतर्गत दरमहा 1500 रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा केले जातात. मात्र जून महिना ओलांडून गेला तरी अद्याप महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही. आता याबाबत पैसे मिळण्याची संभाव्य तारीख समोर आली आहे.

प्राथमिक माहितीनुसार लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पैसे पाठवण्यासाठी निधीचे वितरण केले जाऊ शकते. त्यानंतर 17 जुलैपर्यंत लाडक्या बहिणींना पैसे मिळू शकतात. सरकारने मात्र याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. 17 जुलैपर्यंत जून महिन्याचा हप्ता जमा झाला नाही तर जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांचे मिळून 3000 रुपये एकत्र जमा होऊ शकतात, अशीही चर्चा आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर या हप्त्याबद्दल महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो. त्यानंतर सामाजिक न्याय विभागाकडून निधी वितरीत करण्यात येण्याची शक्यता आहे. सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा होऊ शकतात.

हेही वाचा –  शेतकरी असेल तर जमीन खरेदी ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

लाडक्या बहिणींना आतापर्यंत मे महिन्याचे पैसे मिळालेले आहेत. मे महिन्याचे पैसे हे 15 जूननंतर मिळाले होते. तर एप्रिल आणि मार्च या दोन महिन्यांचे एकत्र 3000 रुपये लाडक्या बहिणींना देण्यात आले होते. ही रक्कम मे महिन्यात देण्यात आली होती.

सध्या राज्यात 1 कोटी 70 लाख लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ दिला जातो. तर साधारण 80 लाख लाडक्या बहिणींचे नाव यादीतून हटवण्यात आले आहे. ई-केवायसी न करणे, चूकीची माहिती देणे, कागदपत्रांत त्रुटी आढळणे, योजनेच्या निकषात न बसणे या कारणांमुळे महिलांना या योजनेतून अपात्र ठरवण्यात आले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button