बीएड महाविद्यालयांना चार हजार पुस्तके अनिवार्य

पुणे : माध्यमिक स्तरावर शिक्षक होण्यासाठी आवश्यक असलेल्या बीएड महाविद्यालयांना त्यांच्या ग्रंथालयात किमान चार हजार पुस्तके ठेवणे अनिवार्य आहे, असे निर्देश राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदे अर्थात एनसीईटीने दिले आहे. त्यामुळे आता शिक्षणशास्त्र महाविद्यालयांना ग्रंथालयात पुस्तकांची संख्या वाढवावी लागणार आहे.
बीएड महाविद्यालयांना ग्रंथालयात एनसीईआरटी आणि एनसीईटीच्या व्यतिरिक्त अन्य पुस्तके ठेवावी लागतील. यासंदर्भात सर्व बीएड महाविद्यालयांना सूचना देण्यात आल्या आहेत. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार बीएड महाविद्यालयांना दरवर्षी १०० नवीन चांगली पुस्तके खरेदी करून ग्रंथालयात ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. यावरुन आता महाविद्यालयांना ग्रंथालयकडे योग्य पद्धतीने लक्ष द्यावे लागणार आहे. या सूचनाची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करण्याचे संकेतही एनसीटीईकडून देण्यात आले आहे.
हेही वाचा – पिंपरी चिंचवडमध्ये मराठी चित्रपट महोत्सव !
शिक्षणशास्त्र पदवीवरुन एनसीटीईकडून अनेक बदल करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे अलीकडे एक वर्षाचे बी.एड आणि एक वर्षाचे एम.एड अभ्यासक्रमांनाही एनसीटीईने मान्यता देण्यात आली आहे.
तसेच, बी.एड महाविद्यालयांमध्ये संसाधन केंद्रे उघडण्याचा प्रस्ताव देखील दिला आहे. बी.एड महाविद्यालयांमध्ये उघडल्या जाणाऱ्या संसाधन केंद्रांमध्ये शालेय मुलांशी संबंधित शिक्षक साहित्य तयार केले जाईल. हे साहित्य बी.एडचे विद्यार्थी शिक्षकांच्या मदतीने तयार करतील. ही केंद्रे बी.एड महाविद्यालयांमध्ये सुरु केले जाणार आहे.