पुणे

सायबर सुरक्षाबाबत पुण्यात राज्यस्तरीय कार्यशाळा

शिक्षण विश्व: डिजिटल जगात सुरक्षितता आणि सजगतेचा संदेश

पुणे : राष्ट्रीय सेवा योजना (NSS) युनिटच्या वतीने १६ ते १८ फेब्रुवारी दरम्यान तीन दिवसांची राज्यस्तरीय सायबर सुरक्षा कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न झाली. कार्यशाळेला Savitribai Phule Pune University चे प्रायोजन लाभले होते. या वर्षी कार्यशाळेचा विषय होता — “यह नया भारत है – साइबर सुरक्षा में सशक्त और खतरों के प्रति सतर्क”.

हेही वाचा –    Tumbbad 2 च्या विलेनसाठी अक्षय खन्नाच्या नावाची चर्चा, धुरंधरनंतर दहशत पसरवणार ‘डकैत’

कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. बी. बी. वाफरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ओमेन थॉमस आणि आनंद कार्येकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाने कार्यशाळेला उत्साहवर्धक प्रारंभ मिळाला.

कार्यशाळेत सायबर गुन्हे, माहिती तंत्रज्ञान कायदा २०००, सायबर सुरक्षेतील नवीन प्रवाह, सायबर हायजिन, सायबर तक्रारी नोंदविण्याची प्रक्रिया तसेच विकसित भारत २०४७ साकारण्यासाठी सायबर सजग युवकांची भूमिका यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल सत्रांचे आयोजन करण्यात आले. सुरक्षित डिजिटल वातावरण निर्मितीसाठी पालक, शिक्षक, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि विद्यार्थ्यांची भूमिका यावर पॅनेल चर्चा देखील झाली.

कार्यशाळेत विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शक उपस्थित होते. त्यामध्ये डॉ. बरीन शेख, शिवप्रसाद जाधव, यद्नेश चव्हाण, अॅड. जयेश भांडेकऱ, अॅड. वैभव साळुंखे आणि पुष्पक शिरुडे यांचा समावेश होता. कार्यक्रमात “Cyber Safe Bharat” या संकल्पनेवर आधारित दीपोत्सव तसेच सायबर सुरक्षा विषयावरील पथनाट्य यांसारखे अभिनव उपक्रम देखील यशस्वीपणे सादर करण्यात आले. महाराष्ट्रातील विविध भागांतील विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले.

समारोप समारंभासाठी डॉ. गणेश भामे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी स्वयंसेवकांना डिजिटल माध्यमांचा सुरक्षित वापर करण्याचे आवाहन केले आणि नागरिकांमध्ये सायबर जनजागृती करण्यावर भर दिला. या वेळी उपसंचालक डॉ. अक्षदा कुलकर्णी, विविध शाळांचे अधिष्ठाता, विभागप्रमुख तसेच मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व मार्गदर्शन प्रा. अरविंद वाघस्कर यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनामुळे स्वयंसेवकांमध्ये सायबर सुरक्षेबाबत सजगता आणि डिजिटल जबाबदारीची जाणीव अधिक दृढ झाली

“सायबर सुरक्षा ही फक्त तंत्रज्ञानाची गरज नाही, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. युवकांनी डिजिटल माध्यमांचा सुरक्षित आणि सजग वापर करून समाजात सकारात्मक बदल घडवले पाहिजेत.”
– डॉ. बी. बी. वाफारे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button