Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचा काँग्रेस विरोधात निषेध आंदोलन

आंतरराष्ट्रीय ग्लोबल AI समिटदरम्यान काँग्रेसच्या गोंधळाविरोधात युवा मोर्चा आक्रमक

पिंपरी-चिंचवड :  पिंपरी चिंचवड शहराच्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने काँग्रेस विरोधात जोरदार घोषणाबाजी आणि निषेध आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन भारतातर्फे आयोजित प्रतिष्ठित ग्लोबल AI समिट दरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांच्या गोंधळाची निषेधार्थ करण्यात आले.

दिल्लीमध्ये झालेल्या या आंतरराष्ट्रीय समिटमध्ये जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्रातील नेते आणि इनोव्हेटर उपस्थित होते. भारतीय सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताला तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर सन्मान मिळत असतानाही काँग्रेस कार्यकर्त्यांनी समिटच्या ठिकाणी घुसखोरी करून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, असा युवा मोर्चाचा आरोप आहे.

युवा मोर्चाचे पदाधिकारी म्हणाले की, “AI आणि नव्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताची जागतिक ओळख वाढत असताना अशा प्रकारचे वर्तन चुकीचा संदेश देते. देशाच्या प्रगतीला अडथळा निर्माण करणे व युवकांसमोर चुकीचे उदाहरण ठेवणे अस्वीकार्य आहे.”

हेही वाचा –  Tumbbad 2 च्या विलेनसाठी अक्षय खन्नाच्या नावाची चर्चा, धुरंधरनंतर दहशत पसरवणार ‘डकैत’

आंदोलनात भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दिनेश यादव, पिंपरी चिंचवड शहराचे संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, शहर समन्वयक अजित कुलथे, शहर सरचिटणीस उदय गायकवाड, तसेच शहरातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांमध्ये राहुल खाडे, प्रसाद कस्पटे, सुमित घाटे, देवयानी भिंगारकर, अतुल बोराटे, मयूर काळभोर यांसह जवळपास 40 हून अधिक कार्यकर्त्यांचा समावेश होता.

भारतीय जनता युवा मोर्चाचा स्पष्ट असा इशारा होता की, “राजकारण करण्याचे हक्क प्रत्येकाला आहेत, पण देशाची प्रतिमा खराब करून राजकारण करणे योग्य नाही. युवापिढीच्या समोर असे उदाहरण ठेवणे म्हणजे त्यांना चुकीचा संदेश जाण्याचा मार्ग उघडणे.” युवा मोर्चाने काँग्रेस आणि राहुल गांधी यांना धाडसीपणे समजावून सांगले की, देशाच्या प्रगतीच्या मार्गात अडथळे निर्माण करणारी ही मानसिकता आता लोकसमोर स्पष्ट झाली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“AI आणि नव्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताची जागतिक ओळख वाढत असताना अशा प्रकारचे वर्तन चुकीचा संदेश देते. देशाच्या प्रगतीला अडथळा निर्माण करणे व युवकांसमोर चुकीचे उदाहरण ठेवणे अस्वीकार्य आहे. “देशाच्या प्रगतीच्या मार्गात कोणताही गोंधळ सहन केला जाणार नाही. युवकांच्या भविष्यासाठी सकारात्मक उदाहरण निर्माण करणे आपली जबाबदारी आहे, फक्त राजकीय खंडणी करणे नाही.”

– दिनेश यादव, शहराध्यक्ष, भाजपा, युवा मोर्चा.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button