Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

पश्चिम घाटातील प्रजातींच्या जतन, संशोधनाला चालना

पुणे : झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियातर्फे (झेडएसआय) आकुर्डी येथे ‘पश्चिम घाट प्राणिशास्त्रीय संग्रह केंद्र आणि संग्रहालय’ उभारण्यात येणार आहे. पश्चिम घाटाच्या परिसरातून संकलित केलेले प्राणी नमुने, नव्याने शोधल्या जाणाऱ्या प्रजातींचे सुरक्षित जतन आणि शास्त्रीय नोंदणीही या केंद्रातून होणार असून, पश्चिम घाटाशी संबंधित संशोधनाला चालनाही दिली जाणार आहे.

पश्चिम घाट हा जगातील महत्त्वाच्या जैवविविधता ‘हॉटस्पॉट’पैकी एक आहे. वनस्पतींपासून प्राण्यांच्या अनेक प्रजातींनी पश्चिम घाट समृद्ध आहे. तसेच, प्रदेशनिष्ठ, संकटग्रस्त प्रजातीही या परिसरात आढळतात. गेल्या काही वर्षांत पश्चिम घाटांतून कीटक, वनस्पतींच्या अनेक नव्या प्रजाती शास्त्रज्ञांनी शोधल्या आहेत. त्यामुळे पश्चिम घाटाची जैवविविधता, पर्यावरणीय महत्त्व लक्षात घेऊन जतन, संवर्धन, संशोधनावर भर देण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर, पश्चिम घाटातील समृद्ध आणि वैशिष्ट्यपूर्ण प्राणिज संपदेचे शास्त्रीय दस्तऐवजीकरण, जतन आणि अभ्यास करण्यासाठी झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियांतर्गत पश्चिम प्रादेशिक केंद्र येथे ‘पश्चिम घाट प्राणिशास्त्रीय संग्रह केंद्र आणि संग्रहालय’ हे अत्याधुनिक केंद्र उभारण्यात येणार आहे. झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या संचालक ध्रिती बॅनर्जी यांच्या हस्ते शनिवारी (२१ फेब्रुवारी) सकाळी  केंद्राचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.

हेही वाचा –  पंतप्रधान नरेंद्र मोदी २ दिवसाच्या इस्रायल दौऱ्यावर जाणार ; मोठ्या कराराची अपेक्षा

मूळ नमुन्यांसह नव्याने शोधलेल्या प्रजातींचे सुरक्षित जतन आणि संवर्धन, वर्गीकरणशास्त्र आणि प्रणालीशास्त्र संशोधनासाठी भक्कम पाया उपलब्ध करणे, जैवविविधता मूल्यांकन आणि संवर्धन धोरणनिर्मितीसाठी संदर्भ साहित्य उपलब्ध केले जाणार आहे. विद्यार्थी, संशोधक आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी शैक्षणिक दालन आणि संग्रहालयाची उभारणी केली जाणार आहे. संग्रहालयाच्या माध्यमातून विज्ञानप्रसार आणि जनजागृती कार्यक्रम राबवण्याचे नियोजन आहे. केंद्रामुळे राष्ट्रीय जैवविविधता दस्तऐवजीकरण उपक्रमांना चालना मिळण्यासह संवर्धन नियोजनासाठी आवश्यक वैज्ञानिक माहिती उपलब्ध होऊ शकणार आहे. तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबर संशोधन सहकार्य वाढीस लागणार आहे.

पश्चिम घाट परिसरातून संकलित केलेले दहा लाखांहून अधिक प्राणी नमुने जतन करण्याची सुविधा या केंद्राद्वारे उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यात विविध प्रकारचे कीटक, शंख-शिंपले, मासे, उभयचर, सरपटणारे प्राणी, पक्षी आणि सस्तन प्राणी अशा विविध प्राणिगटांतील नमुन्यांचा समावेश आहे. प्राणिनमुन्यांचा डिजिटल विदासाठा निर्माण करून पश्चिम घाटातील प्रजातींची माहिती जागतिक स्तरावर उपलब्ध करून देण्याचीही योजना आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button