Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रमुंबई

आयोगाचे ४० ॲप्स आता एकाच ठिकाणी! मतदारांचे काम होणार सोपे; घरबसल्या मिळणार ‘या’ सुविधा

मुंबई  : केंद्रीय निवडणूक आयोगाने ईसीआयनेट हे ॲप विकसित केले आहे. निवडणूक आयोगाच्या आधीच्या ४० हून अधिक स्वतंत्र ॲप्स आणि वेबसाइट्सना एकाच छताखाली आणून हे नवीन एकात्मिक ॲप तयार करण्यात आले आहे.या ॲपमुळे मतदार यादीत नाव नोंदविणे, नावात बदल करणे, तसेच मतदान केंद्र कोठे आहे आणि तिथे जाण्याचा मार्ग काय आहे, हे सहज शोधता येणार आहे.

याशिवाय लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची टक्केवारीची माहितीही मिळणार आहे. मुख्य निवडणूक अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी, निवडणूक नोंदणी अधिकारी, निरीक्षक आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या अभिप्रायाच्या आधारे या ॲपमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. आता नागरिकांकडून मिळालेल्या सूचनांचेही परीक्षण करून ॲपला अधिक वापरकर्ताभिमुख बनवले जाणार आहे.

हेही वाचा –  राज्यातील आरोग्यसेवा बळकट करण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांच्यासोबत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची दिल्लीत बैठक

या महिन्याअखेरीस ईसीआयनेट ॲपचा अधिकृत शुभारंभ करण्याचे प्रस्तावित असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने म्हटले आहे.या ॲपमुळे मतदानाच्या दिवशी मतदानाच्या टक्केवारीचे कल दर दोन तासांनी थेट पाहता येतात. उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी, मालमत्ता आणि शिक्षण यांची माहिती एका क्लिकवर मिळते.

बीएलओ आणि निवडणूक अधिकाऱ्यांसाठी डेटा भरण्याची प्रक्रिया डिजिटल आणि सोपी झाली आहे. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सांख्यिकीय अहवाल प्रसिद्ध करण्यासाठी पूर्वी महिने लागायचे. आता मात्र ईसीआयनेटमुळे हे काम ७२ तासांच्या आत पूर्ण करणे शक्य झाले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व नागरिकांना ईसीआयनेट हे नवीन ॲप डाउनलोड करण्याचे आणि त्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी सूचना १० जानेवारीपर्यंत देण्याचे आवाहन केले आहे. वापरकर्ता नागरिक ॲपमधील ‘सबमिट अ सजेशन’ या पर्यायाद्वारे आपल्या सूचना नोंदवू शकतात.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button