Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुणेकरांना विंटेज अन् क्लासिक कार्स बघण्याची संधी; वाचा कधी आणि कुठे द्यावी लागणार भेट..!

पुणे :  मागील शतकातील दुर्मिळ व नामवंत व्यक्तींनी वापरलेल्या विंटेज अँड क्लासिक कार्स यांचे अनोखे प्रदर्शन ‘विंटेज अँड क्लासिक कार, मोटर सायकल एनवल फिएस्टा २०२५’ याचे प्रदर्शन पुण्यात शनिवार दि. २९ व रविवार दि. ३० मार्च २०२५ या दोन दिवशी रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब, पुणे येथे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात पुण्याच्या समृद्ध ऑटोमोटिव्ह वारशाचा अद्वितीय उत्सव साजरा केला जाणार आहे. शनिवारी (दि. २९) रोजी सकाळी १०.०० वाजता या प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन होईल.  हे प्रदर्शन दुर्मिळ आणि ऐतिहासिक वाहनांची अनोखी झलक सादर करणार असून, नागरिकांसाठी शनिवारी व रविवारी या दिवशी हे प्रदर्शन विनामुल्य खुले असणार आहे अशी माहिती विंटेज अँड क्लासिक कार क्लब ऑफ इंडियाचे चेअरमन नितीन डोसा (मुंबई) यांनी पत्रकार परिषदेत  दिली. यावेळी सुभाष.बी.सणस,  सुभाष सणस, प्रकाश कुलकर्णी, अर्णव एस.,  सुभाष गोरेगावकर, निशांत मेहता उपस्थित होते. कै. बाबुराव सणस यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या प्रदर्शनात सर्वोत्कृष्ट व्हिंटेज कारला विशेष ट्रॉफी देण्यात येणार आहे.   या प्रदर्शनात १०० दुर्मिळ आणि अमूल्य विंटेज व क्लासिक कार्स तसेच १०० विंटेज स्कूटर्स आणि मोटरसायकल्स यांचा सहभाग असणार आहे. वाहनप्रेमी आणि संग्राहकांसाठी हे प्रदर्शन ऐतिहासिक ऑटोमोटिव्ह कारागिरीचा अभूतपूर्व अनुभव देणारे ठरणार आहे.

या प्रदर्शनाला केवळ पुण्यातूनच नव्हे, तर मुंबईतील विंटेज कार्सचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. या प्रदर्शनाचे विशेष आकर्षण म्हणजे बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील नामांकित व्यक्तींनी वापरलेल्या विंटेज आणि क्लासिक गाड्यांचा अप्रतिम संग्रह असणार आहे. मुंबईचे अब्बास जसदानवाला यांची भारतातील सर्वात जुनी  धावणारी १९०३ची कार हंबर ही विशेष आकर्षण असणार आहे. सुभाष सणस यांच्या मालकीच्या नेताजी सुभाषचंद्र बोस आणि कुटुंबीयांनी वापरलेली डॉज किंग्सवे, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी वापरलेली कन्व्हर्टेबल इंपाला,  हॉलिवूड स्टार अल पचिनो यांची मर्सिडीज बेंझ, अमिताभ बच्चन यांची व्हाइट मर्सिडीज, विनोद खन्ना यांची 2 डोअर सिल्व्हर कलर मर्सिडीज, बाळासाहेब ठाकरे यांनी वापरलेली २००९ मर्सिडीज-बेंझ, अभिनेते चंकी पांडे यांच्या मालकीची १९८२ची 2 डोअर स्पोर्ट्स मर्सिडीज-बेंझ, ब्रुनेईचे राजे यांची १९८१ मर्सिडीज-बेंझ लिमोझिन, जर्मन पोलिस प्रमुखांनी वापरलेली १९८२ मर्सिडीज-बेंझ, तसेच नितीन डोसा यांच्याकडील १९५२ची क्रायस्लर कन्व्हर्टिबल एक्स जीयुव्ही मद्रास, यश रुईया यांच्या कडील १९४७ एमजी  व इतर सेलिब्रिटीज यांच्या विंटेज कार्स तसेच ‘बॉबी’ फेम राजदूत मोटार सायकल अशा अनेक वाहनांचा समावेश आहे.

हेही वाचा –  पिंपरीत ‘द बर्निंग वेनस्डे’

या व्यतिरिक्त, पेबल्स बीच यूएसए विजेता एल्विसची 1933, शेखर सावडेकर यांची जुनी कार 1919 ओव्हर लँड, 1956 ची डॉज, १९३८ ची सर्वात जुनी मोटारसायकल नॉर्टन 500, ऑस्टिन 7 इत्यादी प्रदर्शित केले जातील. रोल्स रॉईस, बेंटली, मर्सिडीज बेंझ, शेवरलेट, मॉरिस कन्वर्टिबल, ऑस्टिन, फोर्ड व इतर फॉरेन कार्स यांचा यात समावेश आहे. धनंजय बदामीकर, डहाणूकर, योहान पूनावाला, झहीर वकील, साबळे कुटुंब, मुंबईचे नितीन डोसा, यश रुईया अशा अनेकांच्या संग्राह्तील या विंटेज व क्लासिक कार्स आहेत. पुणेकरांनी या प्रदर्शनासाठी यावे आणि या विंटेज अँड क्लासिक कार प्रदर्शनाचा आनंद घ्यावा, असे आवाहन नितीन डोसा आणि सुभाष सणस यांनी केले आहे.

हा फिएस्टा मिशेलिन इंडिया आणि एन एम टायर्स हे मुख्य प्रायोजक असून, रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब (RWITC) यांचे सहप्रायोजकत्व आहे. तसेच, महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या सहकार्याने आणि वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशन (WIAA) यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा संपन्न होणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button