खासगी, सार्वजनिक जागेवर फ्लेक्स लावण्यास बंदी

पुणे : विधानसभा निवडणूक कालावधीत खासगी व्यक्तींच्या जागेवर व सार्वजनिक प्राधिकरणाच्या जागेवर संबंधितांच्या परवानगी शिवाय निवडणूक प्रचाराचे साहित्य लावण्यास जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी निर्बंध आदेश जारी केले आहेत.
जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी अथवा त्यांच्या हितचिंतकाने निवडणुकीच्या प्रचारासाठी झेंड्याच्या काठ्या उभारणे, कापडी फलक लावणे,
हेही वाचा – ‘शरद पवारांनी राज्याला विकासापासून दूर ठेवले’; उदयनराजेंची टीका
भित्तीपत्रक लावणे, घोषणा लिहिणे इत्यादीकरीता कोणत्याही व्यक्तीच्या खासगी जागा, इमारत, आवार, भिंती इत्यादीवर संबंधित मालकीच्या परवानगी शिवाय व संबंधित सार्वजनिक प्राधिकरणाची परवानगी शिवाय वापर करण्यास निर्बंध लावण्यात आले आहेत.
हे आदेश २५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत अंमलात राहतील. तसेच, आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित हे लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ मधील तरतुदीनुसार व भारतीय न्याय संहिता २०२३ कलम २२३ प्रमाणे दंडनीय कार्यवाहीस पात्र राहतील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.





