रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला मिळाला नवा कर्णधार, जाणून घ्या RCB चा संपूर्ण संघ

RCB Captain | रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या चाहत्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. आयपीएल २०२५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार कोण असेल? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. मात्र आता या प्रश्नावरील पडदा उठला आहे. कारण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएलच्या पुढील हंगामासाठी आपला नवीन कर्णधार जाहीर केला आहे.
आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे नेतृत्व रजत पाटीदार करणार आहे. विराट कोहली आयपीएल २०२५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात खेळाडू म्हणून सहभागी होणार आहे. तो संघाचे नेतृत्व करणार नाही. रजत पाटीदार २०२१ पासून आयपीएल खेळत आहे. त्याने २०२१ ते २०२४ या कालावधीत २७ आयपीएल सामने खेळून ७९९ धावा केल्या आहेत. यात नाबाद ११२ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. त्याने आयपीएलमध्ये एक नाबाद शतक आणि सात अर्धशतके केली आहेत. आयपीएलमधील कारकिर्दीत त्याने ५४ षटकार आणि ५१ चौकार मारले आहेत.
हेही वाचा : इंद्रायणी थडी होणारच.. पण, प्रतीक्षा आणखी काही दिवसांची..!
आयपीएल २०२५ साठी आरसीबी संघ :
रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, लियाम लिव्हिंगस्टोन, फिल साल्ट, जेकब बेथेल, देवदत्त पडिकल, जितेश शर्मा, कृणाल पांड्या, टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड, यश दयाल, रसिक दार सलाम, सुयश शर्मा, स्वप्नील सिंग, नुवान तुषारा, मनोज भंडागे, स्वस्तिक चिकारा, लुंगी एनगिडी, अभिनंदन सिंग, मोहित राठी.