Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुणे महापालिका निवडणूकांची तयारी झाली सुरु

पुणे : एकीकडे विधानसभेत महायुतीतील भाजपाला मोठे यश मिळाल्याने आता पुणे महानगर पालिकेत पुन्हा सत्ता आणण्याची जोरदार तयारी एकीकडे भाजपाने सुरु केली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतील प्रत्येक घटक पक्षाने स्वतंत्रपणे लढण्याची तयारी सुरु केली आहे. गेली अडीच वर्षे पुणे महानगरपालिकेत प्रशासक असल्याने पुणेकरांच्या नागरी प्रश्नांकडे दुर्लक्ष झालेले आहे. भाजपाला महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकीत १३२ हून अधिक जागा मिळाल्याने भाजपाचा आत्मविश्वासात वाढ झालेली आहे.

भाजपाने पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची एकाधिकार शाही मोडीत काढली असल्याने भाजपा आता आपला सर्वाधिक मतदार असलेल्या पुण्याच्या महापालिकेत सत्ता मिळविण्यासाठी कामाला लागले आहे. पुणे शहरातील विधानसभेत भाजपाने ५० हजार भाजप सदस्यांच्या नोंदणीचे लक्ष्य ठेवले आहे. तर शहरातील प्रत्येक प्रभागात दहा हजार भाजपाचे सदस्य नोंदणीचे लक्ष्य आहे. महापालिका निवडणूकीसाठी प्रत्येक विधानसभा मतदार संघात निरीक्षक नियुक्त केले जाणार आहेत. पुणे शहर भाजपा यासाठी लवकरच प्रभाग निहाय बैठका घेणार आहे.

हेही वाचा    –    ‘उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर..’; भाजपा नेत्याचं खुलं आव्हान

या संदर्भात भाजपाचे कसबा येथील आमदार हेमंत रासने यांनी प्रतिक्रीया दिलेली आहे. विधानसभा निवडणूकांच्या निकालानंतर भाजपाने महापालिका निवडणूकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षांकडून कोणतीही तयार होताना दिसत नाही.महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला एकत्र सामोरे जायचे की स्वबळावर महापालिका निवडणूक लढवायची यावर महाविकास आघाडीत अजूनही एकमत होताना दिसत नाही असे भाजपा आमदार हेमंत रासने यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना म्हटले आहे.

आमची स्वबळावर निवडणूका लढायची तयारी असली तरी महाविकास आघाडीत एकमेकांचा मान सन्मान राखला गेला पाहिजे, अन्यथा स्वबळावर निवडणूका लढण्याची तयारी आम्ही ठेवलेली आली आहे असे शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी म्हटले आहे.दुसरीकडे कॉंग्रेसने जर महाविकास आघाडीत पुणे महापालिका एकत्र लढविण्याचे ठरले नाही तर आम्ही देखील स्वतंत्रपणे लढण्याची तयारी ठेवल्याचे कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी म्हटले आहे.

दुसरीकडे उद्धव ठाकरे गट आणि मनसेकडून देखील महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीला सुरुवात करण्यात आली आहे, राज ठाकरे स्वतः जातीने महापालिका निवडणुकीत पुण्याकडे लक्ष देणार आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या घोषणेच्या प्रतीक्षेत आहेत. आगामी पुणे महानगरपालिका निवडणूक विधानसभा निवडणुकीपेक्षाही अधिक चुरशीची होणार यात शंका नाही असे म्हटले जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button