Breaking-newsताज्या घडामोडीपुणे
पुण्यात नव्या कोरोना रुग्णांचा उच्चांक
पुणे- देशात प्रत्यक्ष उपचार घेणार्या कोरोना रुग्णांच्या संख्येत पुण्याचा क्रमांक पहिला लागत आहे. पुण्यात कडक निर्बंध लादल्यानंतरही काही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार तब्बल 21,788 रुग्ण सध्या उपचार घेत असून ही रुग्णसंख्या देशात सर्वाधिक आहे .तसेच पुणे जिल्ह्यात काल दिवसभरात 3 हजार नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. पुणे शहरातही नव्या रुग्णसंख्येचा हा उच्चांक मानला जात आहे.
पुण्यातील कोरोनाची परिस्थिती चिंताजनक असली तरी अजून तरी लॉकडाऊन लागू करण्यात आला नाही ,मात्र आता कडक निर्बंध आणले जाणार आहेत, अशी माहिती पुण्याच्या विभागीय आयुक्तांनी दिली आहे.





