‘भाजप आगामी निवडणूक फडणवीसांच्या नेतृत्वात लढणार’; चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : काँग्रेसने छत्रपती शिवजी महाराजांचा किती अपमान केला याची आपल्याकडे यादीच असून त्यांच्या राजकारणाला तोडीस तोड उत्तर देऊ, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. तर आगामी विधानसभा निवडणूक भाजप देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात लढेल असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान भाजप कोअर कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीत रावसाहेब दानवे यांच्यावर राज्य संयोजकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून विधानसभेच्या पार्श्वभूमीवर दानवेंकडे मोठी जबाबदारी देण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी दिली आहे. बावनकुळे पुढे म्हणाले की, महायुतीमध्ये ज्या मतदरासंघात आपल्याला राजकीयदृष्ट्या वाढता येणार नाही असे नेतेच आमच्या पक्षातून बाहेर पडले आहेत. समरजितसिंह घाटगे हे देखील आमचे नेते होते. मात्र, ज्या जागेवर निवडणूक लढवण्यासाठी स्कोप नाही.
हेही वाचा – शिवपुतळा कोसळल्याप्रकरणी मविआचं आज ‘जोडे मारो’ आंदोलन
ज्या जागा महायुतीला गेल्या आहेत. त्या ठिकाणी त्यांना निवडणूक लढवायची आहे. आता ज्यांनी दुसऱ्या पक्षात जाऊन निवडणूक लढवण्याचा विचार केला. त्यांना आम्ही समजावण्याचा प्रयत्न केला आहे. आता अशा पद्धतीचा पेच जास्त ठिकाणी नाही. एक ते दोन ठिकाणी आहे. मात्र,पक्षातून कोणीही बाहेर पडणार नाही याची आम्ही काळजी घेऊ, असे त्यांनी म्हटले आहे.





