सकाळी नाश्त्यात दह्याचे सेवन केले तर त्याचे तुम्हाला अनेक फायदे
दह्यामुळे पचन चांगले होते. प्रतिकार क्षमता वाढते. हाडे मजबूत होतात.

पुणे : तुम्ही सकाळी नाश्त्यात दह्याचे सेवन केले तर त्याचे तुम्हाला अनेक फायदे होतात. नाश्त्यात दही खाणे ही जुनी परंपरा आहे. जर तुम्ही सकाळी नाश्त्यात दही खात असाल तर त्याचा तुमच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.
नाश्त्यात दही खाल्यानंतर तुमची प्रतिकारक्षमता (इम्यूनिटी) वाढते. दह्यात व्हिटॅमिन सी असते. व्हिटॅमिन सी इम्यून सेल्स वाढवतो. त्यामुळे
दह्याची खास वैशिष्टय म्हणजे त्यात लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया असतात. यामुळे शरीरातील सूक्ष्मजीवांचे संतुलन होते. दह्यामधील अँटिऑक्सिडंट आणि प्रोबायोटिक घटकांमुळे सूक्ष्मजीवांचे संतुलन सुधारते. त्यामुळे पचनकार्य चांगले होते. शरीराचे पीएच बॅलेन्स होते.
हेही वाचा – ‘जागतिक स्तरावर झेप घेण्यासाठी बहुभाषिक व्हा’; कविता भोंगाळे
उच्च रक्तदाब (बीपी) असलेल्या रुग्णांसाठी दह्याचे सेवन अनेक प्रकारे फायदेशीर आहे. कारण दहीमध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे बीपीचे नियंत्रण करण्यास मदत मिळू शकते. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे ते रक्त पेशींना आतून थंड करते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.
या सर्व फायद्यांसाठी तुम्ही नाश्त्यात दही सेवन केले पाहिजे. यामुळे तुम्हाला आतून निरोगी ठेवण्यास मदत करू शकते. तसेच जेव्हा तुम्ही ते सकाळी खाता तेव्हा ते सूर्यप्रकाशातून बाहेर पडलेल्या व्हिटॅमिन डीशी एकत्र होते आणि कॅल्शियम रिस्टोर होतो.