‘जागतिक स्तरावर झेप घेण्यासाठी बहुभाषिक व्हा’; कविता भोंगाळे
शिक्षण विश्व: गायत्री इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ' इंडो जपान मिलाप 2025'

पिंपरी- चिंचवड : परदेशातील शिक्षण, नोकरी, परदेश प्रवास, आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहार, राजकीय, सामाजिक संबंध यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. म्हणूनच जागतिक स्तरावर झेप घेण्यासाठी बहुभाषिक होणे आवश्यक आहे असे मत गायत्री इंग्लिश मीडियम स्कूलच्या व्यवस्थापकीय संचालिका कविताताई कडू पाटील यांनी व्यक्त केले.
गायत्री इंग्लिश मिडीयम स्कूल यांचा जपानी भाषा आणि प्रशिक्षण अभिमुखता कार्यक्रम मोशी, साधुराम गार्डन येथे मोठया उत्साहात साजरा झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. संस्थाध्यक्ष विनायक भोंगाळे यांच्या पुढाकारातून इंडो जपान मिलाप 2025 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रमुख पाहुणे कंसाई जापान इंडिया कल्चरल सोसाइटी उपाध्यक्ष श्तोमिओ इसोगाई सन, मोजेइक कंपनीचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक हिरोयुकी इशिदा सन, इवोल्विंगएक्स कंपनीचे सीईओ अमोल नितावे, अवअनीआर टेक्नोलॉजीचे रमेश धवन तसेच सौरभ सराफ, प्रियांका वाईचाळ विश्वस्त सरिता विखे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली भागवत, मुख्याध्यापक- उपमुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
हेही वाचा – पुणे जिल्ह्यात साडेचार लाख ‘फार्मर आयडी’ तयार
प्रमुख पाहुण्यांनी युवकांना जपान व्यवसायातील संधी याबाबत विषेश मार्गदर्शन केले. यावेळी तोमिओ म्हणाले की, भारतीय तरुणांमध्ये प्रचंड प्रमाणात बौद्धिक संपन्नता असून या बौद्धिक संपन्नतेची गरज इतर राष्ट्रांना मोठ्या प्रमाणात आहे. या राष्ट्रांची गरज त्यांची संस्कृती समजून घेतल्यास भारतीय तरुणांचे भविष्य अत्यंत यशस्वी आहे.
व्यवस्थापकीय संचालिका कविता भोंगाळे म्हणाल्या की, जागतिक स्तरावरील आव्हाने पेलताना प्रत्येक विद्यार्थी सक्षमपणे उभा राहिला पाहिजे. त्यासाठी गायत्री शाळा नेहमीच प्रयत्न करत असते. इंडो जपान मिलाप या कार्यक्रमातून विद्यार्थी व्यावसायिकदृष्ट्या घडविण्याचा प्रयत्न आहे.
येथे जॅपनीज फॉरेन लँग्वेज सेंटर सुरू होणार असून यातून विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. नव्या शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षणावर भर दिला आहे. याच धोरणात इंग्रजी, संस्कृत व भारतीय भाषा शिकण्यास प्रोत्साहन देऊन बहुभाषिकतेला देखील महत्त्व दिले आहे
आंतरराष्ट्रीय दळणवळण, तंत्रज्ञान यामुळे जग हे ग्लोबल खेडे झाले. परदेशातील शिक्षण, नोकरी, परदेश प्रवास, आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहार, राजकीय, सामाजिक संबंध यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. आपले मूल हे केवळ भारताचे नागरिक नाही तर ते जन्मतःच जगाचे देखील नागरिक आहे. जागतिक स्वीकार्यता मिळविण्यासाठी बहुभाषक होणे आवश्यक आहे असेही कविता भोंगाळे म्हणाल्या.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“आपल्या मुलांची आवड, क्षमता पाहून शाळांनी, पालकांनी मुलांना बहुभाषक होण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. मातृभाषेत शिक्षण घेऊन बहुभाषक होणे गरजेचे आहे. ” यासाठी शाळेतील मुलांना जापनीज भाषेचे शिक्षण देण्यासाठी हे शिवधनुष्य उचलले आहे.
– विनायक भोंगाळे, संस्थापक व अध्यक्ष गायत्री इंग्लिश मिडीयम स्कूल.