ताज्या घडामोडीपुणे

‘या’ औषधांचा योग्य प्रमाणात वापर केल्यास शारीरिक दुर्बलता आणि मानसिक थकवा कमी होण्यासाठी मदत

 धावपळीच्या आयुष्यात लैंगिक क्षमता कमी होणे, थकवा येणे हे सामान्य लक्षण

पुणे : या धावपळीच्या आयुष्यात लैंगिक क्षमता कमी होणे, थकवा येणे हे सामान्य लक्षण आहे. तुमच्या जीवनशैली व्यतिरिक्त जर दुसरी मोठी शारीरिक व्याधी नसेल तर या या खास जडीबुटींचा वापर केल्यास काही महिन्यात तुमचा आत्मविश्वास वाढेल. शारीरिक ताकद वाढल्याचे दिसून येईल. तुमच्या दैनंदिनीत या औषधांचा योग्य प्रमाणात वापर केल्यास शारीरिक दुर्बलता आणि मानसिक थकवा कमी होण्यासाठी मदत होते. अर्थात तुमच्या वैद्यकीय तज्ज्ञाचा एकदा सल्ला आवश्य घ्या.

हेही वाचा –  त्रिवेणीनगरमधील चौकांमध्ये दोन्ही बाजूंना ‘हाईट बॅरीगेट्स’

ही आयुर्वेदिक औषधी तुम्हाला देतील ताकद

1. अश्वगंधा 
शारीरिक आणि मानसिक स्थिती मजबूत करण्यासाठी अनेक वर्षांपासून अश्वगंधाचा वापर भारतीय करत आले आहेत. त्यामुळे शारीरिकच नाही तर मानसिक शक्ती देण्यासाठी अश्वगंधाचा वापर सातत्याने करण्यात येतो. शरीरात चैतन्य निर्माण करण्यासाठी, उत्साह वाढवण्यासाठी तिचा वापर होतो. चांगली झोप येण्यासाठी अश्वगंधा ही वरदान आहे.

2. शिलाजीत
लैंगिक क्षमता वृद्धीसाठी हजारो वर्षांपासून अश्वगंधासोबत शिलाजीतचे सेवन पुरूष करतात. फुल्विक अ‍ॅसिड हा शिलाजीतचा मुख्य रासायनिक घटक आहे. शिलाजीत एक शक्तीशाली अँटीऑक्सिडंट आहे. पुरूषांसाठी उत्साहवर्धकच नाही तर कामवर्धक म्हणून सुद्धा शिलाजीतचा वापर करण्यात येतो. अश्वगंधा औषधीसोबत शिलाजीतचा वापर केल्यास स्नायुना बळकटी मिळते. लैंगिक क्षमता वाढते. अनिद्रेचा त्रास कमी होतो.

3. सफेद मुसळी
सफेद मुसळी ही एक पांढऱ्या रंगाची औषधी वनस्पती आहे. ती जंगलात आढळते. केवळ आयुर्वेदातच नाही तर युनानी आणि होमिओपॅथी पद्धतीमध्ये सुद्धा तिचा वापर करण्यात येतो. यौन समस्यांमध्ये सफेद मुसळीचा वापर करण्यात येतो. शीघ्रपतन, लैंगिक थकवा, शुक्राणूंचे प्रमाण कमी होणे या समस्यांमध्ये सफेद मुसळी हा जालीम उपाय मानण्यात येतो.

4. गोक्षुरा, गोखरू 
गोक्षुराचा (गोखरू), आयुर्वेदमध्ये अनेक ठिकाणी उपयोग आढळतो. थकवा, सुस्ती यांच्याविरोधात हा रामबाण उपाय मानण्यात येतो. कामोत्तेजक म्हणून सुद्धा ते ओळखले जाते. अशक्तपणा कमी करण्यासाठी, आजारपणाशी लढा देण्यासाठी त्याचा सातत्याने वापर करण्यात येतो. गोखरू हे एक न्यूरोट्रांसमीटर आहे. इच्छा आणि शारीरिक क्रिया यांच्यात समन्वयासाठी त्याचा वापर सुचवण्यात येतो.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button