Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, नागपूरच्या जिल्हाधिकारीपदी कुमार आशीर्वाद

मुंबई : नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीसच राज्य सरकारने गुरुवारी सुमारे दोन डझनहून अधिक जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यात नागपूरच्या जिल्हाधिकारीपदी कुमार आशीर्वाद यांची तर अमोल येडगे यांची छत्रपती संभाजीनगर महापालिका आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त अशा २४ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात प्रवीणकुमार देवरे यांची बुलढाणा जिल्हाधिकारीपदी, भारत बाष्टेवाड यांची लातूरला जिल्हाधिकारी म्हणून, महेश गोंदावले यांची गोंदिया जिल्हाधिकारीपदी, विजय राठोड यांची जिल्हाधिकारी कोल्हापूर, वसुमना पंत यांची चंद्रपूर जिल्हाधिकारीपदी, कार्तिकेयन एस. यांची सोलापूर जिल्हाधिकारीपदी तर कुमार आशीर्वाद यांची नागपूर जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यता आली आहे.

हेही वाचा –  ‘छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानातून विश्वासनिर्मिती व्हावी’; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

किरण पाटील यांची पशुसंवर्धन आयुक्तपदी, दीपक सिंगला यांची महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आयुक्तपदी बदली करण्यात आली आली आहे. वर्षा ठाकूर-घुगे यांची महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सहमुख्य कार्यकारी अधिकारीपदी, प्राजीत नायर यांची पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी, जी. श्रीकांत जलजीवन मीशनच्या संचालकपदी, अमोल येडगे यांची छत्रपती संभाजीनगर महापालिका आयुक्तपदी, वर्षा लढ्ढा यांची अमरावती महापलिका आयुक्तपदी, राजेंद्र भारुड यांची कोल्हापूर महापालिका आयुक्तपदी, संजिता मोहपात्रा सांगली- मिरज -कुपवाड महापालिका आयुक्तपदी, श्री अंकित यांची नागपूर महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी, दिलीप स्वामी यांची महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी, अंजली शर्मा जालना महापालिका आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तसेच मिन्नू पी. एम. यांची छत्रपती संभाजीनगर जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, कृष्णकांत कनवारीया जालना जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी, के. मंजुलक्ष्मी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अतिरिक्त आयुक्तपदी, सत्यम गांधी अमरावती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारीपदी, डॉ. जास्मिन यांची कोल्हापूर जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button