ताज्या घडामोडीपुणे

स्वयंपाकघरात असलेले या भाज्या त्वचेवरील टॅनिंग कमी करतील.

नैसर्गिक घटक केवळ टॅनिंग दूर करत नाही तर त्वचा निरोगी आणि चमकदार देखील बनवतात.

पुणे : आपल्यापैकी अनेकांच्या तक्रारी असतात की टॅनिंग दूर करण्यासाठी सर्वात महागडे प्रॉडक्ट वापरून सुद्धा हवे असलेले परिणाम मिळत नाहीत. अशा परिस्थितीत जर तुमची त्वचा देखील जास्त वेळ उन्हात राहिल्याने टॅन झाली असेल आणि महागडे प्रॉडक्ट वापरल्यानंतरही कोणताही विशेष परिणाम दिसून येत नसेल तर तुम्ही चिंता करू नका. कारण तुम्ही तुमच्या स्वयपांक घरात उपलब्ध असलेल्या काही खास भाज्या आहेत त्यांचा वापर करून टॅनिंग दूर करू शकता.

तर स्वयंपाकघरात असलेले या भाज्या त्वचेवरील टॅनिंग कमी करतील. त्याचबरोबर यातील नैसर्गिक घटक केवळ टॅनिंग दूर करत नाही तर त्वचा निरोगी आणि चमकदार देखील बनवतात. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला वेगळं काही खरेदी करावं लागणार नाही आणि याच्या वापराने तुमच्या त्वचेवर कोणतेच दुष्परिणाम होत नाही. इतकेच नाही तर घरी उपलब्ध असलेल्या गोष्टी तुम्ही तुमच्या स्किनकेअर रुटिंगचा भाग देखील बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊयात स्वयंपाकघरात कोणत्या भाज्या आहेत ज्यांच्या मदतीने टॅनिंग दूर करता येते.

बटाटा सर्वात प्रभावी
सर्वप्रथम आपण बटाटाच्या काही प्रभावी गोष्टींबद्दल जाणून घेऊयात, तर बटाटा हा केवळ खाण्यासाठीच उपयुक्त नाही तर त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे. कारण यात काही नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म आहेत, जे टॅनिंग हलके करण्यास मदत करतात. अशातच तुमची त्वचा सुद्धा खूप टॅन झाली असेल तर बटाटे सोलून बारीक करा, त्याचा रस काढा आणि टॅन झालेल्या भागावर लावा. १५-२० मिनिटांनी थंड पाण्याने धुवा. काही दिवसांतच फरक दिसून येईल.

हेही वाचा –  ‘पुणेकरांना मुळशी धरणातून पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव विचाराधीन असून त्यावर लवकरच मार्ग निघेल’; मंत्री चंद्रकांत पाटील

काकडी सर्वात फायदेशीर
काकडी देखील त्वचेसाठी वरदानापेक्षा कमी नाही. कारण काकडीमध्येभरपूर पाणी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेला थंड करतात आणि टॅनिंग दूर करण्यास मदत करतात. टॅनिंग दूर करण्यासाठी काकडीचा रस काढून तो चेहरा आणि हातांना लावा किंवा काकडीचे पातळ काप करा आणि टॅन झालेल्या भागावर तसेच डोळ्यांना लावा. यामुळे त्वचा मऊ आणि ताजीतवानी वाटेल.

टॅनिंगसाठी टोमॅटो सर्वोत्तम
टोमॅटो टॅनिंग कमी करण्यासाठी देखील खूप प्रभावी आहे. यामध्ये असलेले लायकोपीन नावाचे घटक असते जेसूर्याच्या घटक किरणांपासून संरक्षण करते आणि टॅनिंग कमी करते. यासाठी तुमच्या देखील त्वचेवरील टॅनिंग कमी करायचे असल्यास सर्वात प्रथम टोमॅटो बारीक करून त्यात दही मिक्सकरून बारीक पेस्ट तयार करा. तयार झालेली पेस्ट तुम्ही चेहऱ्यावर, हात आणि पायांना लावा. त्यानंतर १५ मिनिटांनी थ्यानंद पाण्याने धुवा. यामुळे त्वचा नैसर्गिकरित्या चमकर आणि फ्रेश दिसेल.

या नैसर्गिक पद्धतींचा अवलंब करून, तुम्ही कोणत्याही रासायनिक उत्पादनांचा वापर न करता घरी टॅनिंगपासून मुक्त होऊ शकता. तसेच, उन्हात बाहेर पडण्यापूर्वी सनस्क्रीन लावणे आणि त्वचा झाकून ठेवणे खूप महत्वाचे आहे, जेणेकरून पुन्हा टॅनिंग होणार नाही. जर तुम्ही तुमच्या त्वचेची नैसर्गिक गोष्टींनी काळजी घेतली तर तुमची त्वचा निरोगी आणि चमकदार राहील.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button