यूजीसी नेट डिसेंबर परीक्षेचा निकाल या आठवड्यापर्यंत होणार जाहीर
उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर ते पाहता येणार ,अर्ज क्रमांक, जन्मतारीख ...

दिल्ली : यूजीसी नेट डिसेंबर परीक्षा 2024 च्या निकालासाठी उमेदवारांना आता जास्त प्रतीक्षा करावी लागणार नाही. या आठवड्यापर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. एनटीएने अद्याप यासंदर्भात कोणतीही घोषणा केलेली नाही, परंतु मीडिया रिपोर्ट्समध्ये सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, या आठवड्यापर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर ते पाहता येणार आहे.
यूजीसी नेट डिसेंबर निकाल 2024 जाहीर झाल्यानंतर, उमेदवारांना आपला अर्ज क्रमांक, जन्मतारीख आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल. यानंतर निकाल तुमच्यासमोर दिसेल.
यूजीसी नेट डिसेंबर परीक्षेचा निकाल कसा पाहावा?
सर्वात आधी ugcnet.nta.ac.in अधिकृत वेबसाईटवर जा. होमपेजवर उपलब्ध यूजीसी नेट डिसेंबर 2024 स्कोअरकार्ड डाउनलोड लिंकवर क्लिक करा. अर्ज आणि जन्मतारीख यासारखे आवश्यक लॉगिन क्रेडेंशियल्स प्रविष्ट करा. निकाल पाहण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी तपशील सबमिट करा आता निकाल आपल्यासमोर प्रदर्शित होईल. ते तपासा आणि नंतर भविष्यासाठी ठेवा.
यूजीसी नेट डिसेंबर परीक्षा 3 ते 27 जानेवारी दरम्यान घेण्यात आली होती. परीक्षेचा शेवटचा पेपर 27 जानेवारी 2025 रोजी झाला होता. एका रिपोर्टनुसार, या परीक्षेला 6 लाखांहून अधिक उमेदवार बसले होते. तात्पुरती उत्तरपत्रिका 31 जानेवारी रोजी जाहीर करण्यात आली.
उमेदवारांना 3 फेब्रुवारी 2025 पर्यंत चॅलेंज सादर करण्याची संधी देण्यात आली होती. त्याचबरोबर आता चाचणी अहवालाची प्रतीक्षा आहे. परीक्षेच्या निकालाबरोबरच एनटीएकडून अंतिम उत्तरपत्रिका जाहीर केली जाणार आहे.
जून सत्रासाठी 11,21,225 उमेदवारांनी नोंदणी
यूजीसी नेट जून 2024 परीक्षेसाठी एकूण 11,21,225 उमेदवारांनी नोंदणी केली होती. या परीक्षेसाठी 6 लाख 35 हजार 587 विद्यार्थिनींनी नोंदणी केली होती, तर 4 लाख 85 हजार 579 पुरुष आणि 59 तृतीयपंथी उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज केले होते. अशा प्रकारे एकूण 9 लाख 8 हजार 580 उमेदवार (81 टक्के) परीक्षेला बसले होते.
PhD प्रवेश गुणवत्ता यादी कशी तयार होते?
PhD प्रवेश गुणवत्ता यादी कशी तयार होते? याचं प्रश्नाचं उत्तर पुढे वाचा. नेट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या नेट पर्सेंटाइलला 70 टक्के, तर मुलाखतीला 30 टक्के वेटेज देण्यात येणार आहे. कॅटेगरी 2 आणि कॅटेगरी 3 या दोन्ही कॅटेगरीतील नेट स्कोअर केवळ एका वर्षासाठी वैध असेल.