आजपासून Apple च्या नवीनतम iPhone 16E मॉडेलची प्री-बुकिंग सुरू
फोनच्या वैशिष्ट्यांबद्दल ,लेटेस्ट मॉडेलमध्ये कोणत्या नवीन गोष्टी पाहायला मिळत आहेत. ते जाणून घेऊयात.

पुणे : तुम्ही आज संध्याकाळी ६:३० वाजल्यापासून Apple च्या नवीनतम iPhone 16E मॉडेलची प्री-बुकिंग करू शकता. या फोनची डिलिव्हरी २८ फेब्रुवारीपासून सुरू होईल. जर तुम्ही नवीन आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या फोनच्या वैशिष्ट्यांबद्दल आणि कॅमेरा फिचर्स बद्दल जाणून घ्या. तसेच फोनचा कोणता स्टोरेज व्हेरिएंट खरेदी करण्यासाठी किती किंमत द्यावी लागेल? त्याची संपूर्ण माहिती येथे जाणून घ्या.
Apple iPhone 16e हा आयफोन भारतात 59,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आला आहे. जर तुम्हाला एकाच वेळी इतके पैसे द्यायचे नसतील तर तुम्ही तो EMI वर देखील खरेदी करू शकता. यामध्ये तुम्हाला फक्त 2,496रुपये मासिक रक्कम भरावी लागेल. तसेच चांगली गोष्ट म्हणजे कंपनी तुम्हाला नो कॉस्ट ईएमआयचा पर्याय देत आहे.
उत्तम एआय सपोर्ट
अॅपलच्या नवीनतम फोनमध्ये तुम्हाला मागील आयफोन मॉडेल्सपेक्षा चांगला एआय सपोर्ट मिळत आहे. ChatGPT, Siri आणि Apple Intelligence व्यतिरिक्त, तुम्हाला उत्कृष्ट प्रायव्हसीची सुविधा देखील मिळते. ॲपल पूर्णपणे त्यांच्या ग्राहकांच्या प्रायव्हसीवर लक्ष केंद्रित करते. कंपनीच्या दाव्यानुसार, Apple iPhone 16e मध्ये इंडस्ट्री लीडिंग प्रायव्हसीचे फिचर्स देखील उपलब्ध आहे.
48 मेगापिक्सेल कॅमेरा आणि एडिटिंग टूल्स
नवीनतम आयफोनमध्ये तुम्हाला एक उत्कृष्ट 48 मेगापिक्सेल कॅमेरा मिळत आहे. तुम्हाला अॅपल इंटेलिजेंसचे असे फीचर्स मिळत आहेत ज्याद्वारे फोटो आणि व्हिडिओ एडिट करणे सोपे होणार आहे. यामध्ये तुम्हाला अनेक एडिटिंग टूल्स मिळतात. तुम्ही ChatGPT वर कोणताही प्रश्न विचारू शकता. तुम्ही मजकूर लिहू शकता. तुम्ही तुमचे बहुतेक काम ChatGPT च्या मदतीने करू शकता. तुम्हाला हे फोनमध्ये इनबिल्ट मिळेल. ज्याद्वारे तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवू शकता.
रंग पर्याय?
इतर Apple मॉडेल्सच्या तुलनेत, तुम्हाला नवीनतम iPhone 16e मध्ये जास्त रंग पर्याय मिळणार नाहीत. कंपनीने यावेळी कोणताही अनोख्या रंगाचा आयफोन लाँच केलेला नाही. यामध्ये तुम्हाला फक्त काळा आणि पांढरा असे दोन रंग पर्याय मिळत आहेत. जे मॅट फिनिशसह येतात.